Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रमविआच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट: केली 'ही' मागणी

मविआच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट: केली ‘ही’ मागणी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्यात एकीकडे विधिमंडळाचे अधिवेशन (Session) सुरू आहे. दुसरीकडे विधान परिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला मतदान (Voting) होत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच आज मविआच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची भेट घेतली.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हे देखील वाचा : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाहाला पोलिसांनी केली अटक

राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतल्यानंतर मविआच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी बोलतांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले की, महाराष्ट्रातील विधान परिषदेतील सभापतीपद हे गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त आहे. याबाबतीत वारंवार सर्व सदस्यांनी विधान परिषदेच्या सभापतीची निवड करावी, अशी भूमिका मांडली आहे.सभागृहात सुद्धा याबद्दलची चर्चा झाली. एक संविधानिक पद अडीच वर्ष रिक्त राहाणे, हे कायद्यातही बसत नाही. हे घटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) सर्व नेत्यांनी मिळून राज्यपाल रमेश बैस यांना याबाबतची निवडणूक घेण्याची विनंती केली आहे, असे दानवे यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Maharashtra Rain Update : IMD कडून राज्यातील ‘या’ चार जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

तसेच या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असून निरोपाचे अधिवेशन आहे, त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक लावणे हा राज्यपालांचा (Governor) अधिकार आहे. परंतु, सरकारने राज्यपालांना याबाबतची माहिती दिली पाहिजे. पण आता जी माहिती मिळाली त्यानुसार महाविकास आघाडीचे ज्यावेळी राज्यात सरकार होते, तेव्हा राज्यापालांना याबाबत कळवले होते. परंतु, आता महायुतीच्या सरकारकडून अद्यापही राज्यपालांना विधान परिषदेच्या सभापतींची निवडणूक घेण्याबाबत कळवलेले नाही. त्यामुळे आता आम्ही राज्यपालांना कळवले आहे. त्याआधारावर तरी ही निवडणूक घ्यावी किंवा राज्यपालांनी सरकारला त्याबाबतच्या सूचना कराव्यात, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले.

हे देखील वाचा : भाजप आमदाराचे राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधान; म्हणाले, “त्यांना संसदेत कोंडून…”

दरम्यान, या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे, गटनेते अजय चौधरी, अनिल परब, भास्कर जाधव, रमेश कोरंगावकर, सचिन अहिर, सुनिल शिंदे, ज.मो.अभ्यंकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे, काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, शेकाप नेते जयंत पाटील यांचा समावेश होता.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या