Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यापावसाळी अधिवेशनाआधीच मविआ आक्रमक; उचलणार 'हे' मोठं पाऊल

पावसाळी अधिवेशनाआधीच मविआ आक्रमक; उचलणार ‘हे’ मोठं पाऊल

मुंबई | Mumbai

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) उद्यापासून सुरूवात होणार असून राज्याचे विरोधी पक्षनेतेच सत्तेत सहभागी झाल्याने यंदाचे पावसाळी अधिवेशन विरोधकांच्या आक्रमतेशिवाय होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे…

- Advertisement -

अंबादास दानवे म्हणाले की, सध्या सत्तेत असलेले हे कलंकित सरकार घटनाबाह्य सरकार आहे. त्यांच्याकडून चहापानाचे निमंत्रण दिले होते. मात्र यावर विरोधी नेते बहिष्कार टाकणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच कांद्याला अनुदान मिळाला नाही, शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळाली नाही, त्यामुळे हे शेतकरी विरोधी सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Accident News : जम्मूमध्ये जवानांना घेऊन जाणारी गाडी नदीत कोसळली

सगळ्यात जास्त आत्महत्या या सरकारच्या काळात झाल्या असून हे सरकारचे अपयश आहे. अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी अनेक प्रश्न तयार असल्याचा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या