Friday, May 3, 2024
Homeराजकीयमुंबई महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार

मुंबई | Mumbai

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे आणि शिवसेनेच्या नेतृत्वातच सत्तास्थापना होईल असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले.

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते म्हणाले की महाराष्ट्र सरकार ११ दिवसही टिकणार नाही असे लोक म्हणत होते. सरकार महिन्याभरात पडेल, गणपतीला पडेल असे म्हणत म्हणत आता दसरा आला. आता बाँब त्यांच्याच खाली फुटतील. शिवसेनेची सर्व तयारी झाली असून आता त्या बाँबचे आवाज येतील असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच मागच्या दसऱ्या मेळाव्याला बोललो होतो की., मुख्यमंत्री शिवसेनाचाच होणार. भाजपसोबत युती झाली असती तरी शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला असता. वर्षभरात जे जे साचले होते ते ते आज पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे एक एकाचा समाचार घेतील, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

संजय राऊत यावेळी म्हणाले की कोरोनाच्या काळात करण्यात आलेले नियम पाळत आम्ही मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा घेत आहोत. पण बिहारमध्ये मात्र हजारोंच्या संख्येने लोकांचे मेळावे होत आहेत. आम्हाला जनाची आणि मनाची लाज आहे म्हणूनच दसरा मेळावा यंदा सभागृहात होत आहे. बाळासाहेबांच्या काळापासून होत आलेल्या दसरा मेळाव्यांचा उल्लेख करत ते म्हणाले की शेवटच्या टोकाला उभे राहून भाषण ऐकत असत, हळूहळू ते पुढे येत गेले.

मुंबई महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत 227 जागांपैकी शिवसेनेला 84, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7 आणि इतर उमेदवारांना 14 जागांवर विजय मिळाला होते. त्यावेळी 84 जागांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला कडवी टक्कर देत 82 जागेवर विजय मिळवला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या