Sunday, October 6, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसंजय राऊत म्हणजे घरकोंबडा, मविआच्या वळू-रेड्यांना चाबकाने फोडून काढणार…; महायुतीतील आमदाराची घणाघाती...

संजय राऊत म्हणजे घरकोंबडा, मविआच्या वळू-रेड्यांना चाबकाने फोडून काढणार…; महायुतीतील आमदाराची घणाघाती टीका

मुंबई | Mumbai
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आली आहे. संजय राऊत नावाचा ‘घर कोंबडा’ रोज एक आरोळी देतो. त्या कोंबड्याला मी सांगतो, की खुराड्यातून रोज बांग देऊ नकोस. तू एक पत्र लिहून दे… मनोज जरांगे पाटील यांना मी आणि ठाकरे गट मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करायला पाठिंबा देत आहे. अशी टीका विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?
संजय राऊतांनी कोंबड्यासारखे रोज भांग देणे बंद करावे आणि मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी त्यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे असे पत्र द्यावे असा टोला आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावला. शरद पवार-रोहित पवारांनी महाराष्ट्रात आग लावण्याचे काम बंद करावे असेही सदाभाऊ खोत म्हणाले. तसेच आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वळू-रेड्यांना चाबकाने फोडून काढणार असेही ते म्हणाले.

- Advertisement -

पुढे ते असे ही म्हणाले, रोज एक घर कोंबडा आरोळी देतो संजय राऊत नावाचा. त्या कोंबड्याला मी सांगतो, रोज भांग देऊ नकोस खुरुड्यातून. तू एक पत्र लिहून दे जरांगे पाटलांना की माझी उबाठा सेना मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करायला पाठिंबा देत आहे. अरे बघूया कोंबड्या तुझ्यात जोर आहे का? असे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले.

शरद पवारांवरही टीका
सदा भाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका करताना म्हंटले, महाराष्ट्राच्या राजकारणात आग लावण्याचं काम शरद पवार करत आहेत. हे वेळीच मराठा समाजाने ओळखले पाहिजे. सगळे दिल्यानंतर या राज्यांमध्ये मराठा समाजामध्ये दुफळी माजवण्याचे काम करत आहेत. मी अनेक वेळा वक्तव्य केले जी माणसे महाविकास आघाडीची निवडून आली. त्यांनी एक पत्र लिहावे सरकारला एक पत्र लिहावे जरांगे पाटलांना मी खासदार अमुक- अमुक लिहून देतो की मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करायला माझा पाठिंबा आहे, असेही सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले.

रोहित पवार विद्वान माणूस आहे. तुम्ही महाराष्ट्रात आग सुटलाय. भाडोत्री सोशल मीडियाची टीम महाराष्ट्रात तुम्ही ठेवली आहे. तुम्ही लिहून द्या, रोहित पवार की मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश करायला या रोहित पवाराचा पाठिंबा आहे. द्या लिहून…. हे आग लावायचे धंदे या महाराष्ट्रातून बंद करा. लोकसभेला जमले म्हणून आता जमेल ही भावना काढून टाका, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे.

महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर अनेक चांगले निर्णय घेतले, अनेक योजना आणल्या. पण महाविकास आघाडीचे नेते टीका करतात. येणाऱ्या निवडणुकीत या महाविकास आघाडीतील वळू रेड्यांना चाबकाने फोडून काढू अशी टीका ही खोत यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या