Friday, May 3, 2024
Homeनाशिकमहिंद्रा युनियनची निवडणूक घेण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे

महिंद्रा युनियनची निवडणूक घेण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे

सातपूर | satpur

महिंद्रा अँड महिंद्रा एम्प्लॉईस युनियन च्या निवडणूक घेण्यासंदर्भात गेल्या तीन ते चार वर्षापासून विविध ठिकाणी विविध स्तरावर पाठपुरावा करण्यात येत होता.

- Advertisement -

मात्र करोना महामारीमुळे आलेल्या संकटामुळे निवडणूक घेता आली नाही, परंतु आता आपल्या कंपनीमध्ये करोनाचे पूर्ण नियम पाळून आपले कामकाज सुरळीत चालू झाले. त्यानंतर पुन्हा निवडणूक घेण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न सुरू केले.

त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेला धरून पालकमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घातले असता त्यानी संपूर्ण प्रकरण ऐकून घेत त्वरित जिल्हाधिकारी यांना निवडणूक घेण्यासंदर्भात योग्य निर्देश देणारे पत्र दिले.

करोना महामारी चे सर्व नियम पाळून आपण निवडणूक घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित करावे असे ह्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या