Sunday, May 19, 2024
Homeनाशिकमक्यास विक्रमी 1900 भाव; उत्पादक सुखावले

मक्यास विक्रमी 1900 भाव; उत्पादक सुखावले

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

महाराष्ट्रासह (maharashtra) गुजरात (gujrat), राजस्थान (Rajasthan) व कर्नाटक (Karnataka) राज्यातील पोल्ट्री कंपन्यांतर्फे (poultry companies) सातत्याने मागणीत वाढ होत असतांना बाजार समितीत (market committee) मात्र मक्याची आवक कमी होत असल्याने यंदा हंगामात प्रथमच मक्यास (maize crop) आज 1910 रूपये क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला. सरासरी 1775 ते 1800 रूपये व कमीतकमी 1700 रूपये भाव मक्यास मिळत असल्याने उत्पादक सुखावले आहेत.

- Advertisement -

आज बाजार समितीत दोनशे वाहनातून शेतकर्‍यांनी आपला मका (maize) विक्रीस आणला होता. परतीच्या पावसाचा यंदा मक्यास मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने उत्पादन घटले आहे. आर्थिक विवंचनेअभावी दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकर्‍यांनी काहीसा ओलसर असलेला मका विक्रीस काढला होता. मात्र या ओलसर मक्यास 1200 ते 1400 रूपयांपर्यंतच भाव मिळाल्याने उत्पादक हताश झाले होते.

बियाणे, खते तसेच मजुरीच्या वाढत्या किंमतीमुळे 23 ते 25 हजारापर्यंत उत्पादन खर्च पोहचला असतांना अपेक्षित खर्च देखील निघत नसल्याने मका उत्पादक (maize producer) निराश झाले होते. त्यामुळे यंदा बाजारात चांगला भाव टिकून असलेल्या कांद्यासह (Onion) शेवगा व कापूस (Cotton) लागवडीवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आल्याने मक्याचे क्षेत्र यंदा घटले आहे.

नवीन मका फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात किंवा अखेरीस येण्याची चिन्हे दिसत आहे. तसेच धुळे (dhule), चाळीसगाव (chalisgaon), जळगाव (jalgaon) आदी भागातील मका देखील काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे येथील बाजार समितीत आवक कमी झाल्याने तसेच पोल्ट्री कंपन्यांतर्फे मागणी वाढत असल्याने मक्याच्या दराने विक्रमी उसळी घेत 1910 रूपये क्विंटलपर्यंत भाव पोहचला आहे.

सरासरी 1775 ते 1800 रूपये भाव उत्पादकांना मिळाला. येथील बाजार समितीत रोख पेमेंट मिळत असल्याने तसेच सायंकाळी 6 च्या आत लिलाव पुर्ण होत असल्यामुळे मालेगावसह (melgaon) नांदगाव (nandgaon), बागलाण (baglan), चाळीसगाव (chalisgaon), साक्री (sakri), पिलखोड आदी भागातून उत्पादक मका विक्रीसाठी आणत आहेत. मागणी अधिक व आवक कमी यामुळे मक्यास चांगला भाव मिळू लागला असल्याने हंगामाच्या शेवटी कां होईना मका उत्पादकांना चांगला दिलासा मिळाला आहे.

मागणीमुळे भाव अधिक वाढण्याचा अंदाज

पोल्ट्री कंपन्यांतर्फे मक्याची साठवणूक केली जात असल्याने मागणीत वाढ झाली आहे. तसेच धुळे, चाळीसगाव, जळगाव आदी भागातील मक्याची आवक देखील कमी झाली असल्याने मक्यास चांगला भाव मिळू लागला आहे. चांगल्या मालास 1910 रूपये तर सरासरी 1775-1800 रूपये भाव दिला गेला.

कमीतकमी 1700 रूपये भाव होता. सुका मका विक्रीस आणला जात आहे. होत असलेली आवक तसेच मागणीतील वाढ लक्षात घेता मक्याचे भाव आगामी काळात अधिक वाढण्याचा अंदाज दिसून येत असल्याची माहिती बाजार समिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भिका कोतकर यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या