Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्याच्या पोलीस दलात मोठा फेरबदल; नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे...

राज्याच्या पोलीस दलात मोठा फेरबदल; नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची बदली

तेजस्वी सातपुते यांच्यावर मोठी जबाबदारी

- Advertisement -

मुंबई ।

मुख्यमंत्री देवेंद्र यांनी पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारी गृह विभागांतर्गत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

गृह विभागाने अप्पर पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक श्रेणीतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नतीचे आदेश निर्गमित केले असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नव्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आज जाहीर करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये कृष्ण प्रकाश यांची अप्पर पोलीस महासंचालक, फोर्स वन पदावरून अप्पर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) पदावर बदली करण्यात आली आहे.

तसेच दत्ता कराळे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र येथून विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य मानवी हक्क आयोग येथे बदली करण्यात आली आहे. तर प्रवीण पडवळ नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असणार आहेत.

राज्य सरकारच्या या मोठ्या प्रशासकीय निर्णयामुळे पोलीस दलातील कामकाजात वेग आणि शिस्त वाढवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे. वरिष्ठ पातळीवरील या बदल्यांनंतर आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तेजस्वी सातपुते यांची पुण्याच्या गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र खरात प्रकरणातील एसआयटीचा तपास सातपुते यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. मोक्षदा पाटील यांची अप्पर पोलीस आयुक्त मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. योगेश गुप्ता यांची गडचिरोलीच्या पोलीस उपमहानिरीक्षपदी बदली करण्यात आली आहे.

यादी वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) मंगळवारी राहाता...