Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्या'महाज्योती'ला निधी उपलब्ध करून द्या

‘महाज्योती’ला निधी उपलब्ध करून द्या

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शासन दरबारी भटके विमुक्त समाज दुर्लक्षित असून अनेक मागण्या वर्षांनुवर्ष प्रलंबित आहेत.

- Advertisement -

महाज्योती ही संस्था सरकारने सुरु केली तरी तिला निधी देण्यास दुजाभाव करत आहे. सारथी संस्थेच्या धर्तीवर महसज्योती संस्थेला तत्काळ २५०० कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा यांसह अनेक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भटक्या विमुक्त समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ करुन अांदोलन केले.

सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास यापुढे रस्त्यावर उतरुन तीव्र अांदोलन केले जाईल असा इशारा भटके विमुक्त समाज विकास परिषदेने दिला. यावेळी विविध मांगण्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

सारथी संस्थेला शासनाने १२०० कोटींचा निधी दिला. मात्र महाज्योती या संस्थेचे अद्याप कार्यालय देखील उघडण्यात आले नाही. भटके विमुक्तांच्या विकासासाठी शासन तुटपुंजी मदत देत आहे. भटके विमुक्त व बारा बलुतेदार यांच्या विकासासाठी बाराशे कोटी व वसतीगृह भत्यासाठी १६० कोटी रुपये मदत द्यावी.

भटके विमुक्तांना क्रिमिलिअरमधून वगळावे, अोबीसी समाजाची जातिनिहाय गणना केली जावी, बार्टीच्या धर्तीवर समाजासाठी फेलोशिप योजना सुरु करावी, महाज्योती संस्थेतर्फे स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण व स्वयंरोजगारासाठी तत्काळ निधी उपलब्ध करुन द्यावा, भटके विमुक्त समाजातील महिलांना स्वतंत्र आरक्षण असावे, भाजप सरकार काळात भटके विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने त्यासाठी आर्थिक तरतूद करावी.

प्रत्येक कार्यालयात अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक करावी. भटके विमुक्तांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण लागू करावे, यशवंतराव चव्हाण आवास मुक्त योजना नाशिक विभागात राबविण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेद्वारे देण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रतन सांगळे, कार्याध्यक्ष मांगुलाल जाधव, संघटक सोमनाथ मोहिते आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या