Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'दहशतवाद ना कधी...

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘दहशतवाद ना कधी भगवा होता…’

मुंबई | Mumbai
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर धरद्विवेदी यांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली. या सर्वांवर दहशतवादी कट रचणे, हत्या करणे आणि धार्मिक उन्माद पसरवणे असे आरोप होते. NIA विशेष न्यायालयाने हा निकाल दिला.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमधील भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज (31 जुलै) मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला. या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर अनेक कुटुंबांचे आयुष्य उध्वस्त झाले. तब्बल १७ वर्षांनंतर या प्रकरणात न्यायालयाने सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. “केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष घोषित करण्यात आले आहे. या निकालानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘दहशतवाद ना कधी भगवा होता, ना कधी राहणार’, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

YouTube video player

हिंदू सहिष्णु असतो देशाच्या विरोधातील कारवाया कधीच करत नाही-एकनाथ शिंदे
सत्य कधी पराभूत होत नाही :

सतरा वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सात कथित आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायाला उशीर झाला हे खरं आहे, पण सत्य कधीही पराजित होत नसतं, हे पुन्हा एकवार सिध्द झालंय.

मालेगावच्या स्फोटांप्रकरणी खोटे आरोप करुन तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला होता. कारण आपली बाजू न्यायाची आहे, याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आदी सात जणांना या आरोपामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागलाय. हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही.

हिंदू कधीही देशविरोधी कृत्यं करु शकत नाही, कारण देशभक्ती हे हिंदूधर्मीयांसाठी धर्मकार्यच असतं. ‘हिंदू दहशतवाद’ नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी चलनात आणला. याच्यासारखा धादांत त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहे?

एक काळंकुट्ट पर्व आज संपलंय. हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला गेलाय. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा आता शंभरपट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल, यात शंका नाही.

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं!

जय हिंद, जय महाराष्ट्र…

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘लोकशाही’च्या बळकटीसाठी मतदारांचे योगदान महत्त्वाचे – जीवने

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महानगरपालिका निवडणूक ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून या प्रक्रियेत मतदारांचे योगदान महत्वाचे आहे. मनपा स्वीप समितीचे विविध नियोजित उपक्रम हे...