Thursday, May 2, 2024
Homeनाशिकमालेगाव: अत्याधुनिक रूग्णालयाचे उद्या लोकार्पण

मालेगाव: अत्याधुनिक रूग्णालयाचे उद्या लोकार्पण

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरातील जाफरनगरातील मनपा संचलित सर्व सुविधांनी युक्त 30 खाटांचे स्व. हारूण अन्सारी रूग्णालयाचे (Harun Ansari Hospital) येत्या 26 जानेवारीस प्रजासत्ताकदिनी (Republic Day) लोकार्पण (Dedication) केले जाणार आहे,

- Advertisement -

अशी माहिती महापौर ताहेरा शेख (Mayor Tahera Sheikh) यांनी देत या रूग्णालयामुळे परिसरातील जनतेची मोठी गैरसोय दूर होणार असून मनपा व शासनातर्फे साकारण्यात येणार्‍या पाच रूग्णालयांमध्ये शहराची आरोग्य यंत्रणा ( Health system) सदृढ होणार असल्याचे स्पष्ट केले.

मनपात आयोजित पत्रकार परिषदेत महापौर ताहेरा शेख (Mayor Tahera Sheikh) यांनी जाफरनगर येथील माजी आ. हारूण अहमद अन्सारी रूग्णालय लोकार्पणाची माहिती दिली. यावेळी माजी आ. शेख रशीद (former mla shaikh rashid), उपायुक्त राजू खैरनार (Deputy Commissioner Raju Khairnar), शहर अभियंता कैलास बच्छाव आदी उपस्थित होते. जाफरनगर परिसरातील रहिवाशांना अली अकबर व वाडिया रूग्णालयात (Wadia Hospital) उपचारासाठी येण्याकरिता अडचण तसेच आर्थिक झळ सोसावी लागत होती.

या पार्श्वभूमीवर माजी आ. शेख रशीद यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेत (National Health Mission Plan) पाठपुरावा करत जाफरनगर येथे 30 खाटांचे रूग्णालयासह 5 कोटीचा निधी (fund) देखील मंजूर करून आणला होता. दोन वर्षापुर्वीच या रूग्णालयाच्या कामास प्रारंभ करण्यात आला होता, अशी माहिती महापौर ताहेरा शेख यांनी दिली. करोनाच्या (corona) पहिल्या व दुसर्‍या लाटेचा वाईट अनुभव मालेगावकरांनी (malegaon) घेतला आहे.

त्यामुळे आरोग्य यंत्रणा सदृढ होण्यासाठी जाफरनगर रूग्णालयाचे काम करोना काळात देखील युध्द पातळीवर सुरूच ठेवण्यात आले होते, अशी माहिती देत महापौर पुढे म्हणाल्या, 30 खाटांच्या या रूग्णालयात 2 शस्त्रक्रिया कक्ष तसेच इतर सुविधा देखील राहणार आहेत. विशेष म्हणजे या रूग्णालयासाठी मनपाने प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले असून येत्या काही दिवसात हा प्रकल्प देखील पुर्ण होणार असल्याने या रूग्णालयातील रूग्णांना ऑक्सीजनची (Oxygen) सुविधा देखील मिळू शकणार असल्याचे महापौर ताहेरा शेख यांनी स्पष्ट केले.

येत्या 26 जानेवारीस जाफरनगर रूग्णालयाचे लोकार्पण कृषिमंत्री दादाजी भुसे, माजी आ. शेख रशीद, महापौर ताहेरा शेख, आयुक्त भालचंद्र गोसावी, उपमहापौर नीलेश आहेर, सभागृहनेते असलम अन्सारी, स्थायी समिती सभापती जफर अहमद, सर्वपक्षीय गटनेते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या रूग्णालयात मनपातर्फे वाडिया व अली अकबर रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी व सेवक नियुक्त करण्यात आले असून औषधांचा साठा देखील उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त राजू खैरनार यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या