Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रMPSC परीक्षेदरम्यान गैरप्रकार, उमेदवाराकडून मोबाईल, ब्ल्यू टूथ इयरफोन हस्तगत

MPSC परीक्षेदरम्यान गैरप्रकार, उमेदवाराकडून मोबाईल, ब्ल्यू टूथ इयरफोन हस्तगत

पुणे | Pune

राज्यात एमपीएससीच्या (MPSC Exam) गट क सेवा मुख्य परीक्षेचं आज आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य परीक्षा २०२१ संयुक्त पेपर १ विविध केंद्रांवर आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, पुण्यातील (Pune) एका केंद्रात उमेदवार गैरप्रकार करताना आढळून आला आहे. संबंधित उमेदवाराकडून मोबाईल आणि ब्लुटूथ इअरफोन जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर एमपीएससीकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. एमपीएससीनं याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.

या ट्विटमध्ये म्हटलं की, “महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा २०२१ संयुक्त पेपर १ ची परीक्षा आज पार पडली. दरम्यान, परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. यामध्ये पुणे जिल्ह्याच्या नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्लूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले. या उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे”

- Advertisment -

ताज्या बातम्या