Wednesday, January 7, 2026
HomeनगरCrime News : पतीची चाकूने छातीवर वार करत आत्महत्या; पत्नीकडून देखील इमारतीवरून...

Crime News : पतीची चाकूने छातीवर वार करत आत्महत्या; पत्नीकडून देखील इमारतीवरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

पती-पत्नीत झालेल्या वादातून पतीने स्वतःच्या छातीवर चाकूने वार करत आत्महत्या केली तर पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीने देखील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना नगर एमआयडीसी जवळील गजानन कॉलनी येथे वडगाव गुप्ता रोडवर १७जुलै रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली.

- Advertisement -

मूळचा उत्तर प्रदेशचा आणि सध्या गजानन कॉलनी येथे वास्तव्यास असलेला अनिल ध्रुव खरवाल (वय २६) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर त्याची पत्नी किरण अनिल खरवाल ही जखमी झालेली असून तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पती पत्नीमध्ये कौटूंबिक वाद झाला, त्यामुळे रागाच्या भरात अनिल याने स्वतः त्याच्या छातीवर चाकू मारून घेतला. त्यामुळे घटनास्थळी रक्ताचा थारोळा पाहून, त्यांच्या पत्नीने घाबरुन गाडी बोलवा, गाडी बोलवा दवाखान्यात न्या असा आरडा ओरडा केला.

YouTube video player

त्यानंतर तिने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली. त्यात ती जमिनीवर पडून जखमी झाली. हा आरडाओरडा ऐकून शेजारील नागरिकांनी तेथे धाव घेतली असता अनिल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला तर त्याची पत्नीही घराबाहेर पडलेली दिसली. काही नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवून दोघांना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल नेले. तेथील डॉक्टरांनी अनिल खरवाल याला तपासून तो औषधोपचारापूर्वी मयत झाला असल्याचे घोषित केले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांच्या अहवालावरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर किरण खरवाल हिचेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पती-पत्नीमध्ये नेमका कशावरून वाद झाला? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....