Friday, May 3, 2024
Homeनगरकोपरगावमध्ये खळबळ! नाल्यात आढळला मृतदेह

कोपरगावमध्ये खळबळ! नाल्यात आढळला मृतदेह

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात बैलबाजार जवळ असलेल्या नाल्यात ४० वर्षीय इसमाचा मृतदेह आढल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी पहाणाऱ्याची एकच गर्दी झाली होती.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोपरगाव शहरातील बैल बाजार नजीक असलेल्या नाल्यात आज सकाळच्या सुमारास एक ४० इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Sarvmat News)

सदरच्या इसमाचे नाव संजय छबु कोपरे असल्याचे समजते. तो शहरातील टाकळी नाका येथिल रहिवासी असून तो गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. सर्वत्र शोध घेतल्यावर सापडत नसल्याने अखेर त्यांच्या कुटुंबियांनी शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान सदर मृतदेहाबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करत सदर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सदर इसमाचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही. याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या