Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्कची सक्ती?

राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्कची सक्ती?

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

करोनासंबंधी ( Corona )सर्व निर्बंध हटविण्याल्यानंतर मास्कची (Mask ) सक्ती हटविण्यात आली. मात्र मास्कचा वापर बंद झाल्यानंतर मुंबईसह राज्यात रूग्ण संख्या वाढल्याचे चित्र आहे( Increased in Corona Patients ). त्यामुळे राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती होऊ शकते, असे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope )यांनी बुधवारी दिले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Prime Minister Narendra Modi ) आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करोनाच्या स्थितीसंबंधी चर्चा करण्यासाठी संवाद साधला. यानंतर राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून त्यांना राज्यातील करोना परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना टोपे यांनी मास्क सक्तीबाबत सूतोवाच केले.

मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे सक्तीचे करण्याबाबत चर्चा झाल्याचे टोपे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसात राज्यात विशेषत: मुंबईत रूग्ण संख्या वाढत आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंचसूत्रीची अंमलबजावणी करणे गरजेचे असून पहिल्या सूत्रानुसार राज्यात दररोज २५ हजारांपर्यंत तपासण्या करण्यात येत आहेत. या चाचण्यांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी राज्यात ६५ ते ७० हजार रूग्ण सापडत होते. मात्र राज्यात सध्या ९२५ सक्रिय रूग्ण आहेत. तथापि चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, राज्यात लसीकरण वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामध्ये ६ ते १२ वयोगटासाठी लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिलेली असल्याने महाराष्ट्रासमोर पुन्हा एक मोठे काम असल्याचे, टोपे म्हणाले.

केंद्राने यासंबंधात विस्तृत नियमावली अद्याप पाठवलेली नसली, तरी ही नियमावली येताच त्यांची अंमलबजावणी आरोग्य विभागाकडून केली जाईल.शाळा आणि पालकांना विश्वासात घेऊन लसीकरण वाढवावे लागणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या