Monday, May 6, 2024
Homeदेश विदेशManipur Violence : मणिपूरमधील हिंसाचार थांबेना! दोन दिवसांमध्ये ५ जणांचा मृत्यू, १८...

Manipur Violence : मणिपूरमधील हिंसाचार थांबेना! दोन दिवसांमध्ये ५ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी

दिल्ली | Delhi

गेल्या अनेक दिवसांपासून मणिपुरमध्ये सुरू असलेला हिंसाचार पुन्हा एकदा उफाळून आला आहे. बिष्णुपूर आणि चुराचंदपूर जिल्ह्यात कुकी आणि मैतैई गटाच्या लोकांनी एकमेकांवर तुफान गोळीबार केला आहे. यामध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला असून १८ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

- Advertisement -

मृतांमध्ये एका गीतकाराचा समावेश असल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यात पुन्हा एकदा हिंसाचाराचा उद्रेक झाल्याने मणिपुरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने तणावग्रस्त जिल्ह्यांमध्ये जमावबंदी तसेच संचारबंदी लागू केली आहे. तसेच हिंसाचाग्रस्त भागांमधील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे.

Crime News : धक्कादायक! भररस्त्यात अ‍ॅमेझॉनच्या मॅनेजरची डोक्यात गोळ्या झाडून हत्या

मणिपूर पोलिसांनी ट्वीट करत यासंबंधी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, कांगपोकपी, थौबल, चुराचंदपूर आणि इंफाळच्या काही भागांमध्ये सुरक्षारक्षकांनी शोध मोहीम राबवली आहे. या मोहिमेमध्ये शस्त्र, दारुगोळा, स्फोटके आणि इतर काही साहित्य सापडले आहे. सध्या मणिपूरमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये १३० अतिरिक्त पोलीस चौकी देखील स्थापन करण्यात आल्या आहेत. तर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आतापर्यंत १,६४६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

या घडामोडीनंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी राज्यातील सद्यस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. बेकायदेशीर स्थलांतरितांचा ओघ आणि जंगलतोड यामुळे भौगोलिक असमतोल निर्माण झाला आहे. या संघर्षाचं मूळ कारणं हीच आहेत, असंही मुख्यमंत्री एन बीरेन सिंह म्हणाले.

झेंडा लावायला मंदिरावर चढले अन्…; तिघांचा करुण अंत, गावावर शोककळा

- Advertisment -

ताज्या बातम्या