Friday, May 3, 2024
Homeक्रीडामणिपूरचे 'ज्ञानेंद्रो निंगोम्बम' हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष

मणिपूरचे ‘ज्ञानेंद्रो निंगोम्बम’ हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष

दिल्ली | Delhi

मणिपूरच्या ज्ञानेंद्रो निंगोम्बम (Gyanendro Ningombam) यांची हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी (President, Hockey India) बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध निवड झाल्यावर, हॉकी इंडियाचे नेतृत्व करणारे ईशान्य भागातील निंगोम्बम हे पहिले अध्यक्ष झाले.

- Advertisement -

यावर्षी जुलै महिन्यात मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आधी कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. दोन वर्षांच्या मुदतीसाठी निवडून गेलेल्या निंगोम्बम यांनी 2009-2014 दरम्यान मणिपूर हॉकीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे आणि ते एका दशकासाठी मणिपूर हॉकीशी जुळले आहेत.

हॉकी प्रशासकीय मंडळाने शुक्रवारी (6 ऑक्टोबर) नवी दिल्लीत 10 वी हॉकी इंडिया कॉंग्रेस आजोजित केली आणि निवडणुकाही घेतल्या. माजी अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवडले गेल्यानंतर हॉकी इंडिया कार्यकारी मंडळामध्ये परतले आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी अधिकृतपणे आपला कार्यभार स्वीकारला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेद्वारे सदस्यांच्या युनिट्ससाठी बैठकीत प्रवेश उपलब्ध करुन देण्यात आला होता. काही सदस्य संबंधित राज्य सरकारने लादलेल्या कोविड -19 प्रतिबंधांमुळे प्रवास करू शकले नाहीत.

प्रो-हॉकी लीगचे महत्त्वाचे सामने पुन्हा एकदा लांबणीवर

करोनाचा धोका युरोपात पुन्हा वाढत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रो-हॉकी लीगचे महत्त्वाचे सामने पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आले आहेत. ब्रिटन, बेल्जियम व चीनने करोनाच्या धोक्‍यात प्रवास करण्यास नकार दिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने सांगितले आहे. यजमान जर्मनीलाही आता सामने खेळता येणार नसल्याचे स्पष्ट झाले असून भारतीय हॉकी महासंघ देखील आगामी स्पर्धेत सहभागी होण्याबात महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. सध्या तरी लीगचे पुरुष गटातील केवळ दोनच सामने लांबणीवर टाकले गेले असले तरी पुढील सामन्यांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या