Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूज"विधानसभा निवडणुक लढविण्याची वेळ..."; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला स्पष्ट इशारा

“विधानसभा निवडणुक लढविण्याची वेळ…”; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला स्पष्ट इशारा

मुंबई | Mumbai

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) फटका बसल्यानंतर आता सरकारची आरक्षणातील सगेसोऱ्यांच्या मागणीसाठी धावाधाव सुरू आहे.या सगेसोऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला १३ जुलै पर्यंतची मुदत दिली असून ही मुदत लवकरच संपत आहे. दुसरीकडे जरांगेंनी राज्यातील विविध जिल्ह्यांत शांतता रॅली काढली असून आज त्यांची ही रॅली परभणी (Parbhani) जिल्ह्यात होती. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करतांना सरकारवर निशाणा साधत मराठा नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

हे देखील वाचा : “येत्या विधानसभेत…”; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, ” राज्य सरकारसह सर्व पक्षांच्या नेत्यांना माझी विनंती आहे की ओबीसी नेत्यांचे ऐकून आमच्या मुलांची माती करू नका. मी निष्ठा सोडणार नाही, सरकारला मॅनेज होणार नाही.तुमची एकजूट मोडू देऊ नका. तुम्हाला हात जोडून विनंती ओबीसींच्या लोकांवर हात उगारू नका. ओबीसी ना ही विनंती मराठ्यांच्या अंगावर जाऊ नका. मात्र ओबीसी नेत्यांना पाडा, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

हे देखील वाचा : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

जरांगे पुढे म्हणाले की, ” विधानसभा निवडणुक लढविण्याची वेळ आली तर राज्यात २८८ उमेदवार उभे केले जातील.त्यात सर्व जातींच्या उमेदवारांचा सहभाग असेल. तसेच आताच्या सरकारने दोन उपमुख्यमंत्री देण्याची प्रथा पाडली. त्यानुसार आम्हीही सर्व समाजाचे ७-८ उपमुख्यमंत्री देणार आहोत. सर्व जाती धर्माचे लोक राजकारणाच्या प्रवाहात आले तर ते आपापल्या जातींना न्याय देतील. त्यामुळे राज्यातील जातीवाद बंद होईल. मुस्लिम, दलित, धनगर, रजपूत आदी सर्व जातींचे उपमुख्यमंत्री करण्यात येतील, असेही मनोज जरांगेंनी म्हटले.

हे देखील वाचा : जि.प. सुपर ५० उपक्रम : जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो.मात्र, आमच्या आया बहि‍णींची डोकी फोडली. सगळा माळी समाज आरक्षणात घातला. मराठ्यांचा धंदा शेती आहे.देवेंद्र फडणवीस तुम्ही छगन भुजबळांचे (Chhagan Bhujbal) ऐकून गुन्हे मागे घेतले नाहीत. उलट एक लाख केसेस अजून आमच्या मुलांवर टाकल्या,असेही मनोज जरांगे म्हणाले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ड्रग्ज तस्करीचा बाेगस धाक दाखवून इंजिनिअरला ३५ लाखांचा गंडा

त्यासोबतच भाजपमधील मराठा नेत्यांनी (Maratha Leader) फडणवीसांना सांगावे की, मराठ्यांचे आरक्षण देऊन टाका. आम्हाला देवेंद्र फडणवीसांवर बोलायची काही गरज नाही.भाजप (BJP) नेत्यांना विनंती मराठ्यांच्या पाठीमागे उभे राहा. नाहीतर मराठे निवडणुकीत काय करतील पाहा, असा इशाराच मनोज जरांगे यावेळी सरकारला दिला.

हे देखील वाचा : NDA सरकारचा अर्थसंकल्प ‘या’ तारखेला निर्मला सीतारमण करणार सादर

दरम्यान, यावेळी जरांगेंनी दीड कोटी लोकांना मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) लाभ मिळाला असल्याचे सांगितले.ते म्हणाले की,सरकारला मिळालेल्या ५४ लाख नोंदी खऱ्या की खोट्या याबाबत निवेदनाद्वारे विचारणा केली होती. त्यावर सरकारने दिलेल्या अभिप्रायानुसार ५४ नाही तर ५७ लाख नोंदी सापडल्याचे प्रोसेडिंग बूकवर असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार मराठा समाजातील सुमारे दीड कोटी लोक आरक्षणात गेले आहेत, असा दावाही जरांगे यांनी केला.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या