मुंबई | Mumbai
महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Government) १५ जातींना ओबीसी यादीत (OBC List) समाविष्ट करण्यात यावे, अशी शिफारस केंद्र सरकारकडे (Central Government) करण्यात आली आहे.पंरतु, या जातींमध्ये मराठा समाजाचा (Maratha Community) समावेश करण्यात आलेला नाही. त्यावरून आता मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी संताप व्यक्त करत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर निशाणा साधला आहे.
हे देखील वाचा : Cabinet Decisions : राज्य सरकारचा धडाका सुरूच; मंत्रिमंडळाच्या एकाच बैठकीत घेतले तब्बल ‘इतके’ महत्त्वाचे निर्णय
यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “१५ जातींचा ओबीसीत समावेश करताना आता ओबीसींच्या आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागत नाही का? छाती बडवून घेणारा तो येवल्याचा डुप्लिकेट नेता कुठं गेला? मराठ्यांना आरक्षण देताना यांना त्रास होतो. एवढा जातीयवाद कशासाठी? सरकारकडून (Government) मराठ्यांची फसवणूक केली जात असून मराठ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे.
हे देखील वाचा : Ratan Tata : राज्य मंत्रिमंडळाची रतन टाटांना श्रद्धांजली; भारतरत्न देण्यासाठी केंद्राकडे विनंती
पुढे जरांगे म्हणाले की, मागील दोन महिन्यापांसून सरकार छोट्या जातींचा समावेश ओबीसीमध्ये करणार आहेत, हे आम्हाला माहीत होते. पोटजाती म्हणून तुम्ही समावेश केला. मग मराठा-कुणबी एक असताना समावेश का नाही केला? असा प्रश्नही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच मराठे आता शहाणे होतील, मराठ्यांचे डोळे उघडणे गरजेचे होते. सरकारने या जातींना ओबीसीत घेतांना महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) लिहून घेतले आहे का? असेही जरांगेंनी म्हटले.
हे देखील वाचा : Ratan Tata Death : राज्य सरकारकडून एक दिवसाचा दुखवटा जाहीर; रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
सरकारने शिफारस केलेल्या १५ जातींची यादी
बडगुजर,सूर्यवंशी गुजर,लेवे गुजर,रेवे गुजर,रेवा गुजर,पोवार भोयार पवार कपेवार,मुन्नार कपेवार,मुन्नार कापू,तेलंगा,तेलंगी,पेंताररेड्डी,रुकेकरी,लोध लोधा लोधी,डांगरी
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा