Sunday, May 19, 2024
Homeनगरओबीसी नेत्यांनी ‘त्या’ उपकारांची परतफेड करावी

ओबीसी नेत्यांनी ‘त्या’ उपकारांची परतफेड करावी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

आम्ही कधी तुमच्याविषयी भेदभाव ठेवला नाही. आमच्या बापजाद्यांनी तुम्हाला साथ दिली. आता तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करू नका. मराठा आरक्षणाच्या विरोधात कुणी बोललं तर मी सहन करत नाही. ओबीसी नेते मराठा आरक्षणाच्या बाबतीत का रोष घेताय? तुम्हाला मोठं करण्यात मराठा समाजाचे योगदान असून ‘त्या’ उपकारांची परतफेड करा, असे म्हणत ओबीसी नेत्यांबद्दल मराठा समाजात नाराजी असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर राज्यभरात फिरत आहेत. सध्या ते जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून त्यांनी शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतले. साईबाबांच्या शिकवणुकीप्रमाणे आम्ही सबुरी ठेवली आहे. सबुरी आहे म्हणूनच मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन सुरु आहे. परंतु ठरलेल्या मुदतीत सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल अशी अपेक्षा असून सरकारला सद्बुद्धी द्या, असे साकडे मनोज जरांगे पाटील यांनी साईबाबांना घातले आहे. जिल्ह्यातील लोकांनी दौर्‍याला मोठा प्रतिसाद दिला असल्याचे म्हणत सरकारने मराठा समाजाच्या वेदना समजून घ्याव्यात अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या