Friday, June 28, 2024
Homeराजकीय"शहाणे व्हा, कधीतरी जातीसाठी बोला, तुमच्यामुळे…" जरांगेंचे विखे पाटलांना जोरदार प्रत्युत्तर

“शहाणे व्हा, कधीतरी जातीसाठी बोला, तुमच्यामुळे…” जरांगेंचे विखे पाटलांना जोरदार प्रत्युत्तर

- Advertisement -

जालना । Jalna

आरक्षणावरुन (Reservation) राज्यामध्ये वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) हवे म्हणून आग्रही आहेत. त्यांना सगेसोयरे शब्दांसह मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी आरक्षण हवे आहे. मात्र लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी देखील उपोषण करत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान भाजप नेते व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काल प्रतिक्रिया दिली होती. मराठा समाजाचे आंदोलन भरकटत चालले असून मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे असे वक्तव्य विखे पाटील यांनी केले होते. विखे पाटलांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जरांगे म्हणाले, विखे पाटील कधीतरी जातीकडून बोला. तुमच्या नगर जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे माजी आमदार देखील इकडे येऊन बोलत आहेत. त्यामुळे मराठ्यांच्या लोकांनी मराठ्यांवर आरोप करणं बंद करा. तुमच्यामुळे जात मरेल. अजूनही हातातून वेळ गेलेली नाही. शहाणे व्हा. असे प्रत्युत्तर जरांगे यांनी दिले आहे.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, मी म्हणजे मराठा समाज नाही. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील कळेल की, आंदोलन का भरकटले? तसेच मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मागितलं आहे. १८८४ च्या सरकारी नोंदी महत्त्वाच्या आहेत की १९९० ला दिलेलं विना नोंदणीचं आरक्षण. याचे उत्तर मराठा समाजाला द्या. विखे साहेब तुम्ही संविधानिक पदावर असून मंत्री आहात. १९६७ ला दिलेल्या आरक्षण वाचून पाहा. ज्यामध्ये कुणबी कुणबींचा समावेश आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे. २००४ ला तुम्ही देखील सरकारमध्ये होता. त्यावेळी सुशील कुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा आणि कुणबी एकच असल्याचा कायदा केला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व मराठा कुणबी आहे. हे मी चुकीचं बोलत नाही.

तसेच, तुम्ही जर मराठा आंदोलन भरकटले असे म्हणत असाल तर ओबीसी आंदोलन भरकटले नाही का? ज्यामध्ये सगळे एकत्र येऊन तलवारी काढण्याची भाषा करत आहेत. त्यांच्या तलवारी तुमच्या बंगल्यात येणार नाही. मात्र गोरगरीब मराठ्यांच्या मानेवर भुजबळांची (Chaggan Bhujbal) तलवार पडेल. त्यामुळे आंदोलन कोणी भरकटवले? हे देखील पहा. कधीतरी जातीकडून बोला. तुमच्या नगर जिल्ह्यातील (Ahmednagar) ओबीसी समाजाचे माजी आमदार देखील इकडे येऊन बोलत आहेत. हे तुम्हाला दिसत नाही का? मराठ्याच्या लोकांनी मराठ्यांवर आरोप करणे बंद करा. तुमच्यामुळे जात मरेल. अजूनही हातातून वेळ गेलेली नाही. शहाणे व्हा.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले होते?

मंत्री विखे पाटील म्हणाले, राज्य सरकार दोन्ही आरक्षणांबाबत विचार करत आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. राज्य सरकार त्यावर नक्की तोडगा काढेल. मात्र आरक्षणाचे आंदोलन आता भरकटत चालले आहे. जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले पाहिजे, असं नाही. आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. मनोज जरांगे पाटील म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही. बाकी या समाजासाठी काम करणारी लोकं भरपूर आहेत. आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या