Saturday, September 14, 2024
HomeनाशिकManoj Jarange Patil : "२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास...''; जरांगेंचा राज्य सरकारला...

Manoj Jarange Patil : “२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास…”; जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

घोटी | प्रतिनिधी | Ghoti

- Advertisement -

राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला असून आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभर दौरे सुरु केले आहेत. काल त्यांची नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे जाहीर सभा पार पडली. त्यानंतर आज नाशिकमधील इगतपुरी (Igatpuri) येथील शेणीत याठिकाणी जंगी सभा झाली. यावेळी त्यांनी येत्या २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यावे, अन्यथा २५ डिसेंबरनंतर मुंबईत (Mumbai) आंदोलन करणार असा इशारा शेणीत येथील सभेत बोलतांना दिला…

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) शेणीत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षणासाठी नोंदी सापडत नव्हत्या, तिथे आज २९ लाख नोंदी सापडल्या आहेत. अजूनही सापडणार आहेत. गेली ७० वर्ष पुरावे सापडत नव्हते. आता राज्यातील सगळ्या जिल्ह्यात १८०५ ते १९६७ पर्यंतचे जुने पुरावे सापडत आहेत. ज्यात आता मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय सरकारची सुटका नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी बोलतांना व्यक्त केला.

Chhagan Bhujbal : “तुम्ही एका समाजाची…”; मंत्रीपदावरून हकालपट्टीची मागणी करणाऱ्या संभाजीराजेंना भुजबळांचे प्रत्युत्तर

पुढे ते म्हणाले की, सकल मराठा समाज आणि परिसरातील ६७ गावांनी या सभेचे आयोजन केले होते. सभेसाठी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव हजर होते. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना लगेच दाखले वाटप सुरू आहे. त्यामुळे आरक्षण दृष्टीक्षेपात आले आहे. म्हणून आता मागे हटू नका, एकजूट कायम ठेवा. सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, २४ डिसेंबरपर्यंत सरकारने आरक्षण दिले नाही तर २५ डिसेंबरनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, पण त्याच्या आधी १ डिसेंबर पासून शांततामय मार्गाने गाव तिथे साखळी उपोषणाची (Chain Hunger Strike) तयारी करा, असे आवाहनही जरांगे यांनी समाजबांधवांना केले. यावेळी उपस्थित बांधवांनी विविध घोषणाबाजी करून लक्ष वेधले.

जरांगे पुढे म्हणाले की, आरक्षणाची लढाई आपण ७० टक्के जिंकलो आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू देऊ नका, ओबीसी समाज बांधवांशी वाद घालू नका, भांडू नका. राजकीय स्वार्थासाठी तणाव निर्माण होऊ देऊ नका. आरक्षणासाठी अशी संधी पुन्हा मिळणार नाही. कच खाऊ नका, आरक्षणासाठी एकजूट ठेवा, राजकारण बाजूला ठेवा, आत्महत्या करू नका, जाळपोळ करू नका, मी तुमच्या जिवावर लढतोय. जिवाची पर्वा न करता मी या लढ्यात उतरलो आहे. कारण मला मराठ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायचे आहे, असेही त्यांनी म्हटले.

Manoj Jarange patil : “छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून…”; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

पुढे ते म्हणाले की, गेली ७० वर्ष आरक्षण नसल्याने मराठा समाजाचे झालेले मोठे नुकसान यापुढे होऊ देणार नाही. माझ्या बांधवांसाठी एकदा आरक्षण मिळू द्या. मी नेहमीच मराठा समाजाची वेदना मांडतो म्हणून सरकारसह सर्वांनी मला शत्रू मानले असले तरी मी त्याला फारसे महत्व देत नाही, असेही जरांगेंनी म्हटले. तसेच मराठा आंदोलनाला राज्यातील मराठ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आजची शेणीत येथील सभा याचेच प्रतीक आहे. आरक्षण सोपा विषय नाही, जितकी जमीन जागा महत्वाची तितकेच आरक्षण महत्वाचे. त्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीत घ्यायचेच असेही जरांगे म्हणाले.

दरम्यान, या सभेला आलेल्या वाहनांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, नाश्ता, चहा, पाणी, शौचालये, आरोग्य व्यवस्था आदींचे उत्तम व्यवस्थापन आयोजकांकडून करण्यात आले होते. हजारो स्वयंसेवकांनी त्यांना सोपवलेली जबाबदारी उत्तम पार पाडली. यावेळी वाडीवऱ्हे, इगतपुरी, घोटी, देवळाली कॅम्प आणि सिन्नर पोलीस (Police) ठाण्याच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नाशकात दोन बिबट्यांचा थरार; एक जेरबंद, एकाचे रेस्क्यू सुरु

- Advertisment -

ताज्या बातम्या