Saturday, November 16, 2024
HomeराजकीयManoj Jarange Patil Warns Cm Eknath Shinde : "मुख्यमंत्र्यांनी दगा फटका केला...

Manoj Jarange Patil Warns Cm Eknath Shinde : “मुख्यमंत्र्यांनी दगा फटका केला तर…”; मनोज जरांगे पाटलांचा इशारा काय?

जालना | Jalna

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवण्यासाठी हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) लागू करण्याची तयारी महायुती सरकारकडून (Mahayuti Government) सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) आधी महायुती सरकार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) थेट इशारा दिला आहे. जालन्यात मनोज जरांगे पाटील हे माध्यमांशी संवाद साधत होते.

हे ही वाचा : उमेदवारीची ‘माळ’ की हाती ‘टाळ’ याकडे श्रीगोंदाकरांचे लक्ष

काही लोकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कानं फुकत आहेत. पण जर त्यांनी राज्यभरातील मराठा समाजाचा, आंदोलन कर्त्यांचा गेम केला तर त्यांनी तसं करू नये, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माननारा असा मराठा समाज आहे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे.

पुढे ते असेही म्हणाले, राज्यात देवेंद्र फडणवीस यांना मणिपूरसारखी परिस्थिती घडवून आणायची आहे, असं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं. इतकंच नाहीतर छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांना दंगल करायच्या आहेत, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं. तसेच आता आंदोलनाच्या निर्णायक टप्प्यावर सोमवारी रात्री १२ वाजेपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी यावेळी केला.

हे ही वाचा : धक्कादायक! Youtube वर पाहून ऑपरेशन केलं, मुलाने गमावला जीव… ‘मुन्नाभाई डॉक्टर’ला अटक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या