Monday, August 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसरकारने गैरसमाजातून बाहेर पडावे....मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, म्हणाले, चर्चेचे गुऱ्हाळ...

सरकारने गैरसमाजातून बाहेर पडावे….मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, म्हणाले, चर्चेचे गुऱ्हाळ…

अंतरवाली सराटी | Antarwali Sarati
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे उच्चस्तरीय मंत्र्यांचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत भेटीसाठी दाखल होण्यापूर्वीच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. आमचे आंदोलन हे अंतरवाली सराटीमध्ये होणार आहे. पण, सरकारने काही डाव टाकल्यास आम्ही मुंबईत दाखल होऊ असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठ्यांच्या पुढे आता सरकार उघड पडलं
मराठा समाजाच्या कुणबी नोंदीवरून जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मराठा समाज आंदोलनात उतरू नये, यासाठी सरकारी पातळीवरही प्रयत्न सुरू आहेत. सरकारचे एक शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार आहे. त्यावर बोलताना जरांगे यांनी म्हटले की, तुम्हाला अजून मराठा समाजाकडून काय अपेक्षित आहे. ५८ लाख नोंदी देणं सरकारचं कर्तव्य आहे. आम्ही मराठ्यांना वेड्यात काढतो हा सरकारचा गैरसमज आहे. शिष्टमंडळ आणि सरकारने गैरसमाजातून बाहेर पडावे आता आम्ही वेळ देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. शिष्टमंडळ काय चर्चा करणार आहे. मराठ्यांचा रोष यांना कमी करायचा आहे. मराठ्यांच्या पुढे आता सरकार उघड पडलं असून आता त्यांना सुट्टी देणार नाही, असेही जरांगे यांनी म्हटले.

- Advertisement -

चहा विकल्याचा पुरावा द्या, मी राजकारण सोडेन; संजय राऊतांचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान

“प्रत्येक वेळी आम्ही चर्चेला सामोरे जातो, शासन वेळ मागते आणि आम्ही तो देतो. गेल्या तीन वर्षांत राज्यात जे जे सरकार आले, त्यांच्या प्रत्येक शब्दाचा मराठा समाजाने पूर्ण सन्मान राखला आहे. मात्र, प्रत्येक वेळी आंदोलन उभे राहिल्यानंतर गोड बोलून वेळकाढूपणा करायचा आणि मराठ्यांना वेड्यात काढून त्यांच्यावर अन्याय करायचा, हा प्रकार आता अजिबात चालणार नाही. केवळ चर्चेचे गुऱ्हाळ चालवण्याऐवजी सरकारने त्वरित ठोस निर्णय घ्यावा.”

२९ ऑगस्टच्या नियोजित आमरण उपोषणावर ठाम राहण्याचा पुनरुच्चार करताना त्यांनी स्पष्ट केले की, “शासनाने येत्या २८ ऑगस्टच्या आत मागण्यांबाबत काय करता येईल ते स्पष्ट सांगावे. आता सरकारला कसलीही सवलत किंवा वाढीव वेळ मिळणार नाही. २९ ऑगस्टचे ठरलेले महाआंदोलन कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही.”

२९ ऑगस्टपासून सुरू होणारे आंदोलन हे अंतरवालीत होणार आहे. पण सरकारने डाव टाकला तर मुंबईत दाखल होऊ असा इशारा जरांगे यांनी दिला. वर्षा बंगला आपल्या सगळ्यांचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोध करणार नाहीत. त्यांना खोलीत अडचण होत असतील तर स्लॅब वर बसून आंदोलन करेल असे जरांगे यांनी म्हटले. मराठा किती दिवस वेड्यात निघेल.मराठ्यांच्या नोंदी देऊन सन्मान करणं सरकारचे काम आहे.नाही दिल्या तर सरकारला आम्ही नीट करू शकतो. राज्यात कुणीही खुष नाही.आम्ही सरकारला नीट करणार असल्याचा गर्भित इशाराही त्यांनी दिला.

मराठा समाजबांधवांनी अंतरवाली सराटीत उपस्थित राहावे
२९ ऑगस्टच्या या निर्णायक आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत उपस्थित राहावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव अंतरवाली सराटीत दाखल होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी आणि वडीगोद्री परिसरात पूर्वतयारीला वेग आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Dindori News : दिंडोरीत FDA चा कारवाईचा बडगा; नियम न...

0
ओझे | Oze अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिंडोरी शहर आणि संपूर्ण तालुक्यामध्ये (Taluka) अन्न सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान हॉटेल...