Monday, May 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजManoj Jarange Patil : "आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची…"; जरांगे...

Manoj Jarange Patil : “आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची…”; जरांगे पाटलांचा CM फडणवीसांवर निशाणा

परभणी । Parbhani

- Advertisement -

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची नवी तारीख जाहीर केली आहे. २५ जानेवारीपासून ते अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. हे सामूहिक आमरण उपोषण असेल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील परभणी दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलता होते.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. होऊ द्या आता. पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या असे म्हणतो. आता कळेल आरक्षण देतो की नाही ते, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

तसेच, मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि धनगर मुस्लिम आरक्षण कसे देत नाहीत हे बघतोच…, असं विधान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. २ कोटी पेक्षा जास्त मराठे आता आरक्षणात गेलेत. २५ जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे. मी राहू न राहू याची परवा नाही, असंही मनोज जरांगे यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : देशाने आपली संरक्षण सिद्धता जगाला दाखवून दिली – पालकमंत्री...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi पहलगामच्या हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशाने आपली संरक्षण सिध्दता जगाला दाखवून देतानाच आत्मनिर्भर भारताचे दर्शनही...