Sunday, May 5, 2024
Homeधुळेएकवीरा देवी मंदिरात मानता, जाऊळ, शेंडी कार्यक्रम

एकवीरा देवी मंदिरात मानता, जाऊळ, शेंडी कार्यक्रम

धुळे dhule । प्रतिनिधी

खानदेश कुलस्वामिनी एकवीरा देवी मंदिरात (Khandesh Kulaswamini Ekvira Devi Temple) 5 एप्रिलपासून चैत्र यात्रोत्सवाला (Chaitra festival) सुरूवात होत असून चैत्र चावदसला मान- मानता, जाऊळ, शेंडी, कुळधर्म कार्यक्रम (program) होणार असून अभिषेक, पूजापाठ करण्यात येणार आहे. अशी माहिती मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली आहे.

- Advertisement -

एकवीरा देवीचा चैत्र यात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. एकवीरा देवीची रथ मिरवणूक दि. 7 रोजी काढण्यात येणार आहे. देवीची रथ मिरवणूक नव्याने बनविण्यात आलेल्या संपूर्ण पितळी रथातून काढण्यात येणार आहे. मिरवणूक शहरातील पारंपारिक मार्गावरून काढण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गांवर भाविकांनी रांगोळी काढून व फुलांची सजावट करून रथयात्रेचे स्वागत करावे, असे आवाहन श्री एकवीरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टने केले आहे.

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोरोनामुळे चैत्र महिन्यातील एकवीरा देवीची यात्रा भरली नव्हती. आता शासनाने सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे 5 एप्रिलपासून यात्रा गजबजणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे लावणार

यात्रेच्या काळात देवीचे दर्शन करण्यासाठी राज्यासह परराज्यातून भाविक येतात. दोन वर्षानंतर यात्रा भरत असल्यामुळे यंदा गर्दी वाढण्याची शक्यता आहे. मंदिराच्या बाहेर मंडप टाकण्यात आले असून पाण्याची सोय करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त पांझरानदीच्या पात्रात विविध व्यवसायिक दुकाने थाटण्यात आली आहे. मंदीर परिसराजवळ पाळणेही उभारण्यात आली आहेत.

रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंदी

शहरात 4 ते 19 एप्रिल या कालावधीत आदिशक्ती श्री. एकविरा देवीची यात्रा भरणार आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी दर्शनासाठी होते. यात्रा उत्सव काळात वाहतुकीचे नियमन, नियोजन करता यावे व भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून वाहतूक नियंत्रणासाठी शहरातील काही मार्ग वाहतुकीसाठी ठराविक वेळेत तात्पुरता स्वरुपात बंद करण्यात येत असल्याची अधिसुचना पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी काढली आहे.

दि. 4 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपावेतो तसेच 5 ते 19 एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपावेतो नेहरु चौक (जुना आग्रा रोड) मुख्यप्रवेशद्वार ते श्री एकविरा देवी मंदिर पावेतोचा रस्ता, जुने धुळे ते नविन पुल ते श्री एकविरा देवी मंदिर पावेतोचा रस्ता, पंचवटी महादेव मंदिर ते जवाहरलाल नेहरु स्टेडीयम टी. पॉईंटचा रस्ता, प्रभात नगर ते जुने धुळ्याकडील नविन पुल पावेतोचा रस्ता, प्रभात नगर ते अमरधामकडून ते श्री एकविरा देवी मंदिर पावेतोचा रस्ता, वीर सावरकर पुतळा ते जुने धुळे नविन पुल पावेतोचा रस्ता वाहतूकीस बंद राहील.

या कालावधीत अवजड वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे अधिसुचनेत म्हटले आहे. हे निर्बंध पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका व अग्निशामक दलाची वाहने यांना लागू होणार नाहीत. त्याचप्रमाणे वरील मार्गात व वेळेत परीस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत. असे पोलीस अधीक्षक श्री. बारकुंड यांनी कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या