Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याड्रोन सर्वेक्षणाद्वारे होणार गावांचे नकाशे

ड्रोन सर्वेक्षणाद्वारे होणार गावांचे नकाशे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्वातंत्र्यानंतर प्रथमच जिल्ह्यात मालमत्तांवरील मालकी हक्क आणि सिमांकन निश्चितीसाठी 1 हजार 429 गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे.

- Advertisement -

त्यामाध्यमातून प्रॉपर्टिचे अद्ययावत नकाशे तयार होतील. त्यामुळे ग्रामीण भागातील मालमत्तांनाही सनद आणि प्रॉपर्टी कार्ड मिळेल. यापुर्वी ब्रिटीशपुर्व काळात सन 1930 साली मालमत्तांचे सर्वेक्षण झाले होते.

स्वातंत्र्यानंतरचे हे पहिलेच मालमत्तांचे सर्वेक्षण असून, यातून या मालमत्तांची निश्चिती करण्यासाठी आता शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प सुरु केला आहे. त्यानुसार सर्वच गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

गावांचे नकाशे तयारी होतील. याचा थेट नागरिकांना फायदा होणार असून सर्वांना प्रॉपर्टी कार्ड आणि सनद मिळेल. त्यामुळे या गावखेड्यातील नागरिकांनाही आपली मालमत्ता तारण ठेवता येईल. त्यातून बँकाही कर्ज देऊ शकतील. कारण सध्याच्या स्थितीत ग्रामपंचायतीच्या नमुना -8 अर्थात मिळकत उतार्‍याचे गहाण खत होत नाही. त्यामुळे बँका कर्ज देत नाही.

आता हा प्रश्न येथून पुढे उद्भवणार नाही. सनद ही साध्या कागदावर दिली जात होती. पण आता तसे होणार नाही. हा अत्यंत महत्वाचा ऐवज असल्याने इंडिया सिक्युरिटी प्रेस मधील उच्च दर्जाच्या सुंदर प्रिंट केल्या जातील. या कागदाची नकल करता येणार नाही. शिवाय तो पुढील 100 वर्ष तरी टिकू शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या