Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaratha Reservation: CSMT स्थानकावर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी; रुळावर उतरून लोकल अडवली

Maratha Reservation: CSMT स्थानकावर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी; रुळावर उतरून लोकल अडवली

मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांचा आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवसा आहे. या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमले आहे. त्यात आझाद मैदानाजवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली आहे. यावेळी काहींनी सीएसएमटी स्थानकावरील रूळावर जाऊन ठिय्या मांडला. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठा आंदोलकांनी गार्ड केबिनमध्ये घुसून मराठा आरक्षणाचे पोस्टर्स लोकलच्या काचेवर धरले. त्याशिवाय रेल्वे रुळा समोर उभे राहून मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या घोषणा दिल्या. मागील ३ दिवसांपासून रेल्वे स्टेशनवर मराठा आंदोलक जमले आहेत. रात्रीच्या मुक्कामालाही मराठा आंदोलक रेल्वे स्टेशनचा आसरा घेत आहेत. मराठा आंदोलकांनी संपूर्ण स्टेशन व्यापले आहे. मराठा आंदोलक बाजूला झाल्यानंतर लोकल सुटली होती.

आज सोमवारचा दिवस असल्याने चाकरमानी मुंबईकर कामावर जायला निघाला आहे. त्यात सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झाल्याने या परिसरात पोलीस यंत्रणेवरील तणाव वाढला आहे. आंदोलकांच्या गर्दीत ठिकठिकाणी नृत्य करण्यात येत होते. काही जणांनी लेझीम हाती धरत डान्स केला.

YouTube video player

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारसोबतची चर्चा अद्याप निष्फळ ठरत असल्याने आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालय परिसरातील काही रस्ते पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्याचबरोबर मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. अनेक भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून सामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मराठा आंदोलक मंत्रालय परिसर, शेअर बाजार इमारतीचा परिसर यांसारख्या अनेक ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....