Monday, May 6, 2024
HomeUncategorizedमराठा क्रांती मोर्चाचा आवाज का दाबला जात आहे?

मराठा क्रांती मोर्चाचा आवाज का दाबला जात आहे?

पुणे |प्रतिनिधी|Pune

पंढरपूर येथून निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा आणि मशाल मोर्चाला राज्य सरकारने परवानगी नाकारली.

- Advertisement -

कार्यकर्त्यांना नोटीस देत संपूर्ण सोलापूर जिल्हात संचार बंदी लागू केली आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी होणाऱ्या मशाल मोर्चाला देखील परवानगी नाकारली.राजकीय पक्षांचे मोर्चे, आंदोलन होऊ शकतात तर मग मराठा क्रांती मोर्चाचा आवाज का दाबला जात आहे? असा प्रश्न मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

मराठा समाजासोबत राज्य शासन दुजाभाव करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव यांनी केलाआमच्या सोबतच का दुजाभाव -मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पंढरपुरात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांसह मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली.

नंतर प्रकाश आंबेडकरांसह नऊ जणांना मंदिरात प्रवेश देत त्यांना विठ्ठलासह रुक्मिणीचे मुखदर्शनही देण्यात आले होते. भाजपा देखील राज्यात विविध ठिकाणी अर्णब गोस्वामीच्या मुद्द्यावरून आंदोलने करत आहे. स्वत: सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीने देखील अनेक ठिकाणी मेळावे घेतले आहेत. या सर्वांना परवानगी मिळते. फक्त मराठा समाजाच्या मोर्चांना आणि आंदोलनांना परवानगी नाकारली जात आहे. हे सरकार मराठा समाजासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप धनंजय जाधव यांनी केला.

विविध कारणांमुळे मराठा समाज संतप्त -मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. समाजामधील हा रोष विविध आंदोलन आणि बैठकांमधून व्यक्त होत आहे. एमपीएससीची परीक्षा घेण्याचा अट्टाहास, नोकरभरती करण्याचा निर्णय, यासारख्या राज्य सरकारच्या काही निर्णयांमुळे मराठा समाजाच्या असंतोषात भर पडली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या