Saturday, April 11, 2026
HomeनगरAhilyanagar : धक्का लागल्याच्या कारणातून मराठा आंदोलकांच्या वाहनावर दगडफेक

Ahilyanagar : धक्का लागल्याच्या कारणातून मराठा आंदोलकांच्या वाहनावर दगडफेक

दगडफेक करणारा संशयित अटकेत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्यासह हजारो आंदोलक मुंबईच्या दिशेने जात असताना रॅलीत पुढे निघालेल्या आंदोलकांच्या एका वाहनावर अहिल्यानगर- कल्याण रस्त्यावर टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) गावाजवळ दगडफेक झाली. दरम्यान, यासंदर्भात दगडफेक करणार्‍या तरूणाविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

- Advertisement -

आकाश अनिल थोरात (रा. टाकळी ढोकश्वर) असे त्याचे नाव आहे. सदरची घटना बुधवारी रात्री 9 च्या सुमारास घडली आहे. या घटनेत त्या वाहनाच्या काचा फुटल्या व वाहनचालक जखमी झाले आहेत. मनोज जरांगे यांची रॅली रात्री उशिरा नगर जिल्ह्यात दाखल झाली. तर ती पुढे कल्याण रस्ता मार्गे नगर जिल्हा हद्द ओलांडायला पहाट उजाडली. दरम्यान, जरांगे यांच्या रॅलीच्या पुढे दुपारपासूनच गावागावातील अनेक आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. अशाच काही आंदोलकांची वाहने अहिल्यानगर- कल्याण रस्त्याने जात असताना रात्री 9 च्या सुमारास टाकळी ढोकेश्वर गावातील पारनेर चौकात आंदोलकांच्या एका वाहनाचा रस्ता ओलांडणार्‍या एका दुचाकीला कट बसला.

त्यामुळे दुचाकीवरील आकाश थोरात याने त्या वाहनचालकाला जाब विचारला. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.काही वेळात प्रकरण शिवीगाळ करण्यावर गेले. त्यावेळी थोरात याने दगडफेक केल्याने वाहनाच्या काचा फुटल्या असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

भाडेतत्वावरील घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai मुंबईमध्ये नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा...