Tuesday, July 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबीएसएनएल, एमटीएनएलच्या जागांवर गृहनिर्माण प्रकल्प उभारणार

बीएसएनएल, एमटीएनएलच्या जागांवर गृहनिर्माण प्रकल्प उभारणार

रेडीरेकनरनुसार जागा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

एकेकाळी मुंबईची संवाद वाहिनी असलेल्या आणि आता डबघाईला आलेल्या एमटीएनएल आणि बीएसएनएलच्या जागांवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारच्या बैठकीत एमटीएनएल आणि बीएसएनएलच्या मालकीची आरक्षित जागा रेडीरेकनर दरानुसार घेण्यास मान्यता दिली. त्यामुळे जागा ताब्यात आल्यानंतर मुंबईतील एमटीएनएल, बीएसएनएलच्या जागेवरील हा पहिलाच गृह प्रकल्प असणार आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची बैठक आज फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीत बोरिवली येथील बीएसएनएलच्या मालकीची तर शिंपोली येथे एमटीएनएलची जागा असून दोन्हीची मिळून एकूण २८.८४ एकर जागा आरक्षित आहे. ही आरक्षित जागा रेडिरेकनर दरानुसार ७२९ कोटी रुपयांना घेऊन या आरक्षित जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचा प्रकल्प राबविण्यास तसेच उर्वरित आरक्षित जागा विकसित करण्याचा प्रस्ताव महामंडळाने बैठकीत ठेवला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली.

या जागेवर सुमारे एक हजाराहून अधिक घरे बांधण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. दरम्यान, मुंबईत शिवाजी पार्क, प्रभादेवी, कुलाबा, बीकेसी अशा मोक्याच्या जागा एमटीएनएलच्या ताब्यात होत्या. आता घरोघरी मोबाईल आल्यामुळे एमटीएनएलच्या लँडलाईन इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या या इमारतींच्या काही जागेतून एमटीएनएलच्या लँडलाईन खासगी कामगारांच्या मदतीने चालवल्या जात आहेत.

बैठकीला गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक कासार, संचालक (प्रशासन) प्रवीण कोळी, तांत्रिक संचालक अभिजित लोंढे, सहायक अधिकारी शिरतेज रसाळ आदी यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik Accident News : बळी मंदिर उड्डाणपुलावर अपघात; महिला जागीच ठार,...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati पंचवटी परिसरातील (Panchvati Area) बळी मंदिर उड्डाणपुलावर सोमवारी (२७ जुलै) रात्री उशिरा एक अत्यंत भीषण अपघात (Accident) घडला. भरधाव वेगाने...