Wednesday, January 7, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : भर पावसात मराठा आंदोलकाचा स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न

Maratha Reservation : भर पावसात मराठा आंदोलकाचा स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न

मुंबई । Mumbai

मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष आता मुंबईत पोहोचला आहे. मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील हे पहिल्यांदाच राजधानीत दाखल झाले असून, त्यांनी बुधवारी (29 ऑगस्ट) सकाळी आझाद मैदानात बेमुदत उपोषणास सुरुवात केली. त्यांच्या या उपोषणाला राज्यभरातून लाखोच्या संख्येने मराठा बांधवांनी हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे आंदोलनकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असला तरी, उत्साह आणि निर्धार यात कुठेही कमी दिसून आलेली नाही.

- Advertisement -

गुरुवारी (28 ऑगस्ट) दुपारपासूनच मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होऊ लागले होते. सकाळी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर पोहोचताच संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला. आझाद मैदानाची क्षमता संपल्यानंतर आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि चर्चगेट परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव केला. पावसाने त्रास दिला तरीही बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात उत्साहाने आपली उपस्थिती कायम ठेवली. काहींनी पावसापासून बचाव करण्यासाठी स्टेशन परिसर, इमारतींचे आडोसे आणि इतर ठिकाणी आसरा घेतला.

YouTube video player

दरम्यान, आंदोलकांचा उत्साह शिगेला असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर एका मराठा आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या व्यक्तीने अंगावर डिझेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर आंदोलकांनी तत्परतेने हस्तक्षेप करत त्याला रोखले आणि डिझेलची बाटली काढून घेतली. त्यानंतर घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी ताबडतोब धाव घेतली. या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

मुंबई पोलिसांकडून आझाद मैदान आणि त्याच्या आसपास मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दीमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी वाहतूक विभागाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले असून, परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू करताना स्पष्ट केले की, मराठा समाजाला ठोस आरक्षणाचा निर्णय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....