Friday, November 15, 2024
HomeराजकीयMaratha reservation - गरज पडेल तेव्हा तलवारी काढू; खा.संभाजीराजे आक्रमक

Maratha reservation – गरज पडेल तेव्हा तलवारी काढू; खा.संभाजीराजे आक्रमक

तुळजापूर । Tulajapur

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. ‘संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. या आंदोलनाला संभाजीराजेंनी हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते. आम्ही भीक नाही तर हक्क मागत आहोत. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका, असंही संभाजीराजे म्हणाले. तसंच येत्या 15 तारखेला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी ठाकरे सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत असं दिसून येतं आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयही नाही असाही आरोप संभाजी राजेंनी केला आहे. आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका. आम्ही दिल्लीला येण्यासाठीही घाबरणार नाही अशा शब्दात केंद्र सरकारने राज्य व केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. राज्यात होणारी आंदोलनं ही भाजपा पुरस्कृत नाहीत असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.

१९०२ मध्ये शाहू मराजाांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं. त्यात मराठा समाजाचाही समावेश होता. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होणे आवश्यक आहे. ८० टक्के मराठा समाज गरी आहे. मात्र आम्ही भीक मागत नाही हक्काचे आरक्षण मागतो आहोत. आम्हाला आता गृहीत धरु नका आणि कायदा हातात घ्यायची वेळ आमच्यावर आणू नका. माझ्या रक्तात शिवाजी महाराज आणि शाहू मराज आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या