Tuesday, March 25, 2025
HomeUncategorizedसत्ताधारी म्हणून हे सर्व मॅनेज आहे…; मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप

सत्ताधारी म्हणून हे सर्व मॅनेज आहे…; मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप

जालना | Jalana
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे आश्वासन सरकारने दिल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण स्थगित केले आहे. त्यांचे उपोषण स्थगित होताच मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी सरकारविरोधात नवा एल्गार पुकारला आहे. सरकारमध्ये सरकारचे लोक आंदोलन करत आहे, त्याला आपण काय करणार? असा प्रश्न उपस्थित करत मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही म्हणून एकत्र झाले आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
“आम्हाला धक्का लागतोय. त्यांना काय धक्का लागतोय. आमच आम्ही घेणार. आम्ही ओबीसीतील आरक्षण घेणार. राज्य सरकारमध्ये ओबीसी नेत्यांवर दबाव आहे. तेच आंदोलन करायला लावतात, सत्ताधारी म्हणून हे सर्व मॅनेज आहे. आमच्या आरक्षणात ते आहेत. त्यांना धक्का लागतोय की नाही हे आम्हाला माहित नाही. आमच्या ओबीसी नोंदी आहेत. हक्काच्या नोंदी आहेत. अर्ध्या तासापूर्वी पुरावे मिळाले आहेत. लाखो नोंदी सरकारने दाबून ठेवल्या आहेत. ब्रिटीश कालीन जनगणनेत मराठा कुणबी दाखवलाय. १८७१ मधले पुरावे आहेत. ते ही घेत नाहीत” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. “छगन भुजबळला स्वत:ची लेकर कळतात, तशी दुसऱ्याची लेकर कळायला पाहिजे. धनगर-मराठ्यांमध्ये भांडण लावतायत हे छगन भुजबळने कमी केले पाहिजे” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

- Advertisement -

हे ही वाचा : मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे उपोषण स्थगित

“छगन भुजबळ १०० टक्के दंगल घडवणार. धनगरांनी वाद चिघळू देऊ नये. शेवटी निर्णय तुमचा आहे. त्यांचे वाघ आहेत, आमचे पण कुणीतरी असतीलच ना. महाराष्ट्रात रस्त्यावर उतरुन दंगल घडवून आणण्याला छगन भुजबळ जबाबदार असणार” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. “भुजबळांच ऐकून वाटोळ करुन घेऊ नका. गोरगरीबांमध्ये भांडण लावण्यापलीकडे काय येते? धनगर बांधवांना मराठ्यांची नाराजी ओढवून घ्यायला लावतोय हे धनगर बांधवांनी समजून घ्याव” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री मराठा समाजाचा आहे, असे म्हणायला पण तोच सांगत आहे. तो सांगतो मी सत्तेत आहे. तुम्ही बिनधास्त लढा. अशा पद्धतीने तो सरकारला वेठीस धरत आहे. त्याला भांडण लावायचे सोडून येतेच काय? मराठा धनगर वाद लावायचे काम हा करत आहे. आमच्या नोंदी असातानी तो कसे म्हणू शकतो की खोट्या आहेत? मंडल कमिशनचे सर्व बाहेर काढावे लागेल. यांचे सर्व आरक्षण बोगस आहे. आम्ही ते रद्द करू, कारण आमचा नाईलाज आहे. भाषणात जातीयवाद नाही सांगता. आणि गाड्या भरून पाठवत आहेत.

मराठा नेत्यांना सांगतो त्यांना सोडुन एकत्र या. यांची भाकरी आम्ही नाही घेतली, तो एकटा भाकरी खातो आहे. मागण्या फक्त त्यांच्या नाही तर आमच्या पण मान्य होणार आहे. एकही नोंद रद्द होणार नाही. झाल्या तर आम्ही दाखवून देऊ. मराठा नेत्यांनी शहाणे होण्याची गरज आहे. यांना काही करायचे असेल मराठ्यांचा नाईलाज आहे. त्यांनी लोक सोडले तर आम्ही रस्त्यावर उतरणार. आमचे चॅलेंज आहे. आम्ही पण रस्त्यावर उतरू, असा इशारा मनजो जरांगे पाटील यांनी दिला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...