Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगेची आजपासून पुन्हा तोफ धडाडणार; 'या' जिल्ह्यात घेणार सभा

मनोज जरांगेची आजपासून पुन्हा तोफ धडाडणार; ‘या’ जिल्ह्यात घेणार सभा

जालना | Jalana

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण करणार्‍या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर आजपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. मनोज जरांगे महाराष्ट्र दौर्‍यासाठी अंतरवाली सराटीतून (Antarwali Sarati) रवाना झाले आहेत. धाराशिवमधील परांडा आणि वाशी तालुक्यात त्यांची सभा होणार आहे.

- Advertisement -

राऊतांना शुभेच्छा कधी द्यायच्या 15 एप्रिल की 15 नोव्हेंबरला; नितेश राणेंचा सवाल

तर भूम तालुक्यातील ईट येथे त्यांची दुपारी 2 वाजता कॉर्नर सभा होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 या ठिकाणी जरांगेंची भव्य सभा होणार आहे. ही सभा 125 एकर शेतात होणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं या सभेची तयारी करण्यात येत आहे.

IND vs NZ : आज भारत-न्यूझीलंड सेमीफायनल सामना; कुणाचे पारडे जड?

दौर्‍याला सुरुवात करण्यापूर्वी गावातील महिलांनी मनोज जरांगेंचं (Manoj Jarange) औक्षण केले आहे. लोकशाहीच्या मार्गानं शांततेत आंदोलन सुरू आहे. 24 डिसेंबरच्या आत मराठा आरक्षण मिळवणारच असा निर्धार मनोज जरांगेंनी व्यक्त केला आहे.

ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवण्याची मागणी; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर नाराजी

- Advertisment -

ताज्या बातम्या