Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याशासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनींचा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा

शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनींचा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा

पुनदखोरे / नांदुरी । वार्ताहर Nanduri

कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणार्‍या कनाशी शासकीय आश्रमशाळेतील ( Kanashi Government Ashram School) सुमारे 250 ते 300 विद्यार्थिनीं मुख्याध्यापिकेच्या जाचास कंटाळून कनाशी ते कळवण प्रकल्प कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढून या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.

- Advertisement -

कनाशी शासकीय आश्रमशाळेच्या मुख्यध्यापिका ऐ. बी. जगताप यांची दोन महिन्यापूर्वी सुरगाणा तालुक्यातील अंबुपाडा शासकीय आश्रमशाळेतून कनाशी येथील शासकीय आश्रमशाळेत बदली झाली होती. तेव्हापासून त्यांच्याकडून विद्यार्थीनींना अपमानस्पद वागणूक मिळत होती. त्याचप्रमाणे जातिवाचक शब्द वापरणे, पालकांना अपमानस्पद वागणूक देणे, विद्यार्थीनींना कामाला लावणे, शैक्षणिक कारणापासून वंचित ठेवणे असे अनेक प्रकार या मुख्याध्यापिकेकडून होत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांच्याकडे केली.

प्रकल्प अधिकार्‍यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थिनींचे म्हणणे ऐकून घेतले. अनेक विद्यार्थिनींनी तक्रारींचां पाढा वाचला. संबंधित मुख्याध्यापिकेला कार्यमुक्त करण्याचे आश्वासन दिले. आश्वासन मिळाल्याने विद्यार्थिनींनी मोर्चा थांबवून त्या प्रकल्प कार्यालयातून माघारी गेल्या. विद्यार्थिनींची बसने कनाशीपर्यंत जाण्याची सोय करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या