Thursday, May 2, 2024
Homeधुळेविवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा

विवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

सततच्या छळला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना चिमठाणे येथे घडली आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

शितल नवल धनगर (वय 27 रा. चिमठाणे ता. शिंदखेडा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिची आई मंगलाबाई देविदास धनगर (रा.खाचणे, ता.चोपडा जि. जळगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार घराच्या वरचा मजला बांधण्यासाठी माहेरून 4 लाख रूपये आणावे तसेच लग्नात मानपान दिला नाही, हुंडा कमी दिला या कारणावरून शितलचा सासरी छळ करण्यात आला.

जिला वेळोवळी मारहाण व दमदाटी करण्यात आली. या छळाला कंटाळूनच तिने विष प्राशन करून जीवन संपविले. तिच्या आत्महत्येस पती नवल चिंतामण धनगर, सासू शेवंताबाई चिंतामण धनगर दोघे रा.चिमठाणे, नणंद सुनंदा शिवाजी धनगर व नंदोई शिवाजी बुधा धनगर दोघे रा.शहादा हे चौघे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार चौघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोसई सुशांत वळवी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या