Friday, May 17, 2024
Homeनाशिकबाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ग्रामपंचायतींच्या राज्यात सध्या निवडणुका सुरु आहेत. राज्य शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार ग्रामपंचायत सदस्य देखील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदार आहेत…

- Advertisement -

त्यामुळे सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून निवडून येणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहू नये यामुळे बाजार समितींच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार, पणन विभागाने घेतला आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. यावर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर, पेठ व नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विद्यमान सदस्यांची नावे अंतिम प्रसिद्ध होणाऱ्या मतदान यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावी व तशी अंतिम यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सारस्ते (तालुका त्र्यंबकेश्वर) चे ग्रामपंचायत सदस्य विनायक माळेकर यांनी केली होती. तसेच राज्यभरातूनही याबाबतची याचिका दाखल करण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या