नाशिक | Nashik
चारित्र्याचा संशय घेत पतीसह सासु-सासरे व नणंदेकडून सासरी उपाशीपोटी ठेवत होत असलेल्या शारिरीक व मानसिक छळास वैतागून मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथील २८ वर्षीय विवाहितेने आपल्या मुलगा व मुलीसह शेतातील विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी मृत विवाहितेची आई ठकुबाई देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती राहुल दिलीप अहिरे, सासरा दिलीप अछि, सासू कांताबाई अहिरे व नणंद सपना या चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
हर्षाली राहुल अहिरे (२८), आरोही राहुल अहिरे (७) व संकेत राहुल अहिर (५) ही त्या मृत आई व मुलगा व मुलीची नावे आहेत. सौंदाणे शिवारात शेत वस्तीत असलेल्या विहिरीत या तिघांचे मृतदेह आज सकाळी आढळून आले. घरालगतच असलेल्या या विहिरीत हर्षालीने मुला-मुलीसह पाण्यात उडी घेतल्याने पाण्यात बुडून तिघे मृत झाले. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह बाहेर काढले. दरम्यान हर्षालीचे माहेर असलेल्या धुळे तालुक्यातील घाडरे येथील आई ठकुबाई, वडिल धर्मा देवरे व कुटूंचियांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सौंदाणे येथे घटनास्थळी धाव घेतली. आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून पतीसह सासरच्या लोकांनी तिचा छळ केल्याने ही हत्त्याच असल्याने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
वडिल धर्मा देवरे यांनी हर्षालीन माहेरहून पैसे आणावेत अशी मागणी करीत तिचा पती राहूल आहिर व त्यांचे आई वडील व बहिण हे छळ करीत असल्याचा आरोप केला. पुर्वी छळ होत असल्याच्या कारणावरून धुळे येथील महिला समुपदेशन केंद्रात दोघात समजोता झाल्याने मुलगी सासरी नांदत होती. गहूल आहिरे व तिच्या कुटुधियांनी पुन्हा छळ सुरू केल्याने तिने हैं। टोकाचे पाऊल उचलले असावे किंवा सासरच्या मंडळीकडून तिचा घातपात झाला असावा असा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे.




