Thursday, March 13, 2025
Homeक्राईमधक्कादायक ! विवाहितेला जाळून ठार मारले

धक्कादायक ! विवाहितेला जाळून ठार मारले

सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील वडगाव (Vadgav) येथील विवाहितेला जाळून ठार मारल्याची (Married Woman Burn To Death) घटना घडली आहे. किर्ती अनिकेत धनवे (वय 22) असे ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी वडगाव येथील अनिकेत धनवे व उल्हासनगर (Ulhasnagar) येथे राहणारी कीर्ती धनवे यांचा प्रेमविवाह (Love Marriage) झाला होता.

- Advertisement -

अनिकेत व कीर्ती यांचे लग्नाच्या पूर्वीपासून जवळचे नातेसंबंध होते. प्रेम विवाहनंतर (Love Marriage) त्यांचे लग्न लावून दिले. मात्र, विवाहितेचे सासरचे लोक तिला सून म्हणून मानत नव्हते. त्यातून तिला सासरचे लोकांनी त्यांचे इतर साथीदाराच्या मदतीने शेतातील छप्परामध्ये स्वयंपाक करीत असतांना मंगळवारी दुपारी जाळुन ठार (Deth) मारले.

याप्रकरणी नवरा-अनिकेत अंकुश धनवे, सासु-करुणा अंकुश धनवे, सासरे अंकुश होनाजी धनवे (सर्व रा. वडगाव ता. पाथर्डी) यांनी साथीदारांच्या मदतीने ठार मारल्याची फिर्याद विवाहितेचे वडिल संतोष विठ्ठल अंग्रख वय 54 (रा. उल्हासनगर, ता. कल्याण जि. ठाणे) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी तांबे करीत असून हवालदार महेश रुईकर हे त्यांना मदत करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...