Friday, September 4, 2026
Homeदेश विदेशFire News : रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

Fire News : रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

दिल्ली । Delhi

- Advertisement -

दिल्लीतील आनंद विहार परिसरातील कॉसमॉस रुग्णालयात शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, ११ रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. दिल्ली अग्निशमन विभागाने तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

दिल्ली अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अग्निशमन दलाने त्वरित काच फोडून ११ रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. तसेच, रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर वेळीच बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

या घटनेत अमित नावाच्या हाऊसकीपिंग कर्मचाऱ्याचा गुदमरून मृत्यू झाला. आग लागल्यानंतर घाबरलेल्या अमितने स्वतःला रुग्णालयातील बाथरूममध्ये कोंडून घेतलं होतं, ज्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

कॉसमॉस रुग्णालय हे आनंद विहार परिसरात जॉइंट रिप्लेसमेंट आणि ट्रॉमा मॅनेजमेंटसाठी प्रसिद्ध आहे. या आगीमुळे रुग्णालयातील उपचार प्रक्रियेवर परिणाम झाला असून, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 38 शिवभोजन चालकांसाठी सव्वा कोटी मंजूर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गरिबांना अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणार्‍या शिवभोजन थाळी योजनेला नगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असला, तरी या योजनेचे केंद्रचालक मात्र,...