Saturday, September 5, 2026
HomeनगरAhilyanagar : 38 शिवभोजन चालकांसाठी सव्वा कोटी मंजूर

Ahilyanagar : 38 शिवभोजन चालकांसाठी सव्वा कोटी मंजूर

तीन महिन्यांचे अनुदान मंजूर; गरिबांची थाळी पुन्हा सजणार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

गरिबांना अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध करून देणार्‍या शिवभोजन थाळी योजनेला नगर जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असला, तरी या योजनेचे केंद्रचालक मात्र, आर्थिक संकटात सापडले आहेत. एकीकडे गरिबांची भूक भागविण्यासाठी शिवभोजन केंद्रे सुरू आहेत; मात्र दुसरीकडे शासनाचे अनुदान रखडल्याने शिवभोजन चालकांची फरफट सुरू होती. मात्र, राज्य सरकारने गुरूवार (दि. 23) रोजी जिल्ह्यातील 38 शिवभोजन केंद्रासाठी 1 कोटी 25 लाख 26 हजारांचे तीन महिन्यांचे अनुदान मंजूर केले आहे. यामुळे गरिबांची थाळी आता पुन्हा सजणार आहे.

जिल्ह्यातील 38 शिवभोजन केंद्रांवरून दररोज सुमारे तीन हजार नागरिकांना भोजन दिले जात आहे. मात्र, केंद्रचालकांना शासनाकडून मिळणारे अनुदान रखडले गेल्या मार्चपासून रखडलेले होते. यातीज मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे असे तीन महिन्यांचे शिवभाजन चालकांचे अनुदान मंजूर झाले आहे. यात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचा समावेश आहे. सरकारने जिल्ह्याठी 1 कोटी 25 लाखांचे अनुदान मंजूर केले असले तरी अद्याप जून, जुलै आणि ऑगस्ट अशा तीन महिन्यांचे अनुदान मंजूर होणे बाकी आहे. दरम्यान, मार्चपासून म्हणजे सहा महिन्यांपासून अनुदान रखडल्याने गरिबांची भूक भागविणार्‍या केंद्रचालकांवरच आर्थिक संकटाची वेळ आली होती.

राज्य शासनाने गरीब व गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी 26 जानेवारी 2020 पासून मशिवभोजन थाळी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत नागरिकांना अवघ्या 10 रुपयांत दोन पोळ्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण आणि एक वाटी भात दिला जातो. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शिवभोजन केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध असते. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एकूण 38 केंद्र सुरू असून, त्यामधून दररोज सुमारे तीन हजार नागरिकांना भोजनाचा लाभ मिळत आहे. मात्र, शासनाकडून केंद्रचालकांना मिळणारे अनुदान वेळेवर प्राप्त होत नसल्याने त्यांना केंद्राचा खर्च भागविण्यासाठी पदरमोड करावी लागत आहे.

शिवभोजन थाळी उपलब्ध करून देणार्‍या केंद्रचालकांना शासनाकडून प्रतिथाळी अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील केंद्रांना प्रति थाळी 25 रुपये, तर शहरी भागातील केंद्रांना प्रति थाळी 40 रुपये अनुदान मिळते. मात्र, मार्च महिन्यापासून देयके रखडल्याने केंद्रचालकांची आर्थिक कोंडी झाली होती. जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांचे सुमारे दोन कोटी रुपयांचे अनुदान थकीत असल्याची माहिती केंद्रचालकांकडून देण्यात आली होती. यातील सव्वा कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झालेले आहे.

शिवभोजनाचे बजेट कोलमाडले
राज्यात वाढत्या महागाईमुळे प्रत्येक घरातील स्वयंपाकाचे बजेट कोलमडलेले असतांना आता शिवभोजनाला महागायीच्या झळाबसतांना दिसत आहे. पनीरसह भाजपला, तेल मीठ आणि साखरेचे भाव वधाल्याने शिवभोजन चालकांना गरिबाच्या थाळीत कसेबसे अन्न शिवजवून देण्याची वेळ आली आहे. वाढत्या महागायीमुळे शिवभोजन चालकांच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

खुशी हाच माझा स्वभाव; देण्यातच आनंदाचा खरा पासवर्ड – राजयोगी ब्रह्माकुमार...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik खुशी हाच माझा स्वभाव आणि धर्म आहे. जीवनातील प्रत्येक कर्म आनंदाने केले पाहिजे. केवळ मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा इतरांना देण्याची वृत्ती आत्मसात...