Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedमातंग समाज आजही योजनांपासून दुर्लक्षित

मातंग समाज आजही योजनांपासून दुर्लक्षित

नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik

आज लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Democrat Anna Bhau Sathe) यांची जयंती (Jayanti) साजरी होत आहे. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरलेे. महाराष्ट्राच्या (maharashtra) एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते.

- Advertisement -

आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी (students) व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास (Exploratory study) करतात. मात्र त्यांच्या नंतर समाजाचे प्रश्न सोडवणारा वाली न गवसल्याने आजही समाज दुर्लक्षित आहे.शाहीर अण्णा भाऊ साठे त्यांच्या कार्याच्या योगदानाबद्दल भारतरत्न द्या. समाजाच्या विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करा. त्यांच्या साहित्याबद्दल डॉक्टरेट पदवी बहाल करा, यासह 25 मागण्या गेल्या बारा वर्षांपासून प्रलबित आहे. इतरांना ग्रहणातून सोडवणारा समाज आजही गरीबी, अज्ञान, अंधश्रध्दा, बेरोजगारीच्या ग्रहणातून बाहेर आलेला नाही.

मातंग समाज अनुसूचित जातीचा (Scheduled caste) एक घटक आहे. त्यात महाराष्ट्रात (maharashtra) दुसर्‍या क्रमांकावर आहे. मात्र त्यांच्या प्रश्नाकडे कधीही गांभीर्याने पाहिले गेले नाही. परिणामी आज हा समाज नोकरी (job), उच्च शिक्षणात (higher education) अवघा 2 टक्के आहे. दोन टक्के फक्त नोकरीस लागतात. इतरांना शिकूनही परंपरागत जीवन जगावे लागते. म्हणूनच स्वतंत्र वाटा ते मागत आहे. मातंग समाजाला अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड वर्ग वारीनुसार आरक्षण देण्यात यावे, ही प्रमुख मागणी आहे. कारण आजही 20% मुले शाळेच्या पटावर नाहीत. 60% मुले चौथी अगोदर शाळा (school) सोडतात.

15% मुले 9-10 पर्यंत शिकतात. 5% मुले ही पदवीपर्येंत शिकतात. उत्पन्नाचे साधन नाही. स्वतःची जमीन नाहीत. उद्योगधंद्यासाठी जागा नाही. अण्णा भाऊ साठे महामंडळ आहे. पण लाभार्थ्यांची प्रगती विचारली तर कोणाला सांगता येत नाही अशी स्थिती आहे. अण्णा भाऊ साठे-मुक्त विद्यापीठ सुरू करावे, महाराष्ट्र हा वीरांचा देश आहे. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे सांस्कृतिक भवन (Lahuji Vastad Salve Cultural Building) बांधून मिळावे. अण्णा भाऊ साठे यांचे विस्तृत साहित्य प्रकाशित करावे. केंद्रीय स्तरावर क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे आर्थिक विकास महामंडळ (Economic Development Corporation) स्थापन करून 1000 कोटीची तरतूद करण्यात यावी.

मातंग समाजातील बेरोजगार (unemployed) यांना योग्य प्रशिक्षण (Training) देऊन रोजगार (Employment) उपलब्ध करून तसेच शासनाची व महानगरपालिकेअतंर्गत होणारी कामे बेरोजगारांना देण्यात यावी. समाजातील महिला ज्या ग्रामीण भागात दाई /आया म्हणून बाळंतपणाचे काम करतात, त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन मानधन देण्यात यावे. तसेच रुग्णालयामध्ये नोकरीत प्राधान्य देण्यात यावे. समाजातील बॅण्ड पार्टी /वाजंत्री यांना महानगरपालिकास्तरावर मोफत देण्यात यावीत.

शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी – अण्णा भाऊ साठे वसतिगृह -मुलांचे आणि मुक्ता साळवे मुलींचे वसतिगृह बांधावे, अण्णा भाऊ साठे नावाने आवास योजना लागू करावी, पदवीधर मुलांसाठी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी शासनाकडून अनुदान, अल्पशिक्षित मुलांसाठी तांत्रिक शिक्षणासाठी अनुदान द्या, समाजाने बनवलेल्या टोपली, सुपे, झाडू, दोरखंडे, खुर्च्यांना बाजारपेठ मिळवून द्यावी. यासाठी मातंग समाज संघ अध्यक्ष विक्रम गायकवाड सातत्याने पाठपुरावा करत आहे. आज जयंतीच्या निमित्ताने पाठपुरव्याला एकीचे बळ देण्याचा निर्धार केल्याशिवाय समाजाला लागलेले ग्रहण सुटणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या