Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमCrime News : मावा व सुगंधी तंबाखू ; अंमळनेरात दीड लाखाचा मुद्देमाल...

Crime News : मावा व सुगंधी तंबाखू ; अंमळनेरात दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाची छापा टाकून कारवाई

गणेशवाडी, सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथे अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत एक लाख 54 हजार 100 रुपयांचा सुगंधी तंबाखू व मावा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पकडले आहे. या कारवाईमुळे नेवासा तालुक्यातील अवैध व्यवसायांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसायावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हे शाखेचे पथक तालुक्यात पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिरे वस्ती अंमळनेर ता. नेवासा येथे अवैधरित्या मावा व सुगंधी तंबाखूची चोरून विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. सदर ठिकाणी पंचासह गुन्हे शाखेच्या पथकाने दि 1 सप्टेबर रोजी रात्री 8 वाजता छापा टाकला.

YouTube video player

तेथे सुनिल आण्णासाहेब येळे याच्या ताब्यात 38 हजार 500 रूपयांचे गोल्डन रंगाचे पाच किलोग्राम वजनाचे 11 पाकीट, 7 हजार रुपये किमतीचे काळ्या रंगाची पाच किलोग्राम वजनाची दोन पाकिटे, 30 हजार रुपये किमतीचे 60 किलो वजनाची पांढर्‍या रंगाची कच्ची कतरी सुपारी, तीन हजार सहाशे रुपयांचा सहा किलो वजनाचा तयार मावा, 70 हजार रुपये किमतीची मावा तयार करण्याची मशीन व 5 हजार रुपये किमतीचा वजन काटा असा एकूण एक लाख 54 हजार 100 रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू सुगंधी तयार मावा व मावा तयार करण्याची मशीन व साधनसामग्री सुनिल आण्णासाहेब येळे (वय 28) याचे कब्जात मिळून आले. पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. आर. द्वारके यांनी पंचासमक्ष जप्त करून तसा सविस्तर पंचनामा केला आहे.

महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला व मानवी शरीरास अपायकारक होईल असा खाद्यपदार्थ सुगंधी तंबाखू व सुपारी मिश्रित तयार मावा खाण्यास अपायकारक आहे हे माहीत असताना देखील आरोपीने त्याची विक्री करण्याचे उद्देशाने प्रतिबंधित सुगंधी तंबाखू बेकायदेशीर स्वतःच्या कब्जात बाळताना मिळून आला असल्याने पोलीस कॉन्स्टेबल अमोल श्रीरंग आजबे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123,223,274,275 प्रमाणे फिर्याद दिली आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक, सोमनाथ वाघचौरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या आदेशाने हवालदार राहुल द्वारके, पोना. रिचर्ड गायकवाड, पोलीस नाईक सोमनाथ झांबरे, पोलीस नाईक बाळासाहेब नागरगोजे, पोकॉ. रमीझराजा आतार, कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, कॉन्स्टेबल अमोल आजबे यांनी ही कारवाई केली आहे.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...