Thursday, May 2, 2024
Homeनगरनियम पाळून गणेशोत्सव, मोहरम सण साजरे करावेत

नियम पाळून गणेशोत्सव, मोहरम सण साजरे करावेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव आणि मोहोरम सण साजरे करावेत, अशी सूचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली. पोलीस मुख्यालय येथे गणपती व मोहरम या सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये महापौर वाकळे बोलत होते.

- Advertisement -

येणारा गणेशोत्सव आणि मोहोरम सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मंडळाचे अध्यक्ष, तसेच मोहरम समितीचे अध्यक्ष-पदाधिकारी यांची जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेशसिंह कुमार, मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके आणि शहरातील पोलीस स्टेशनचे प्रभारी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी यांची बुधवारी बैठक झाली.

यावेळी महापौर म्हणाले, गणपती विसर्जनसाठी महापालिकेच्यावतीने प्रभाग निहाय कृत्रिम तलाव उभारण्यात येतील. जेणेकरून गर्दी टाळण्यात येईल. तसेच मोहरम विसर्जनासाठी कोठला येथे कृत्रिम तलाव व सावेडी गाव येथे कृत्रिम तलाव उभारण्यात येतील. नगरकरांना विनंती आहे, की कोणत्याही प्रकारची विसर्जन मिरवणूक काढू नये, शासनाच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, शासनाच्या आचारसंहिता सोडून कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात येणार नाही. नागरिकांनी नियम पाळून सण आनंदात साजरे करावे असे सांगितले. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार म्हणाले, गणेश मंडळांनी व मोहरम समित्यांनी आचारसंहिता नियमावलीची कडक अंमलबजावणी करावी. भक्तासाठी दर्शनाची व्यवस्था ही फेसबुक लाईव्ह, केबल चॅनल, सोशल मीडिया मार्फत उपलब्ध करावे. कोणत्याही मंदिराच्याबाहेर प्रसाद, पान, फूल आणि अनधिकृत फेरीवाले यांना परवानगी असणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या