Friday, May 3, 2024
Homeनगरमनपाची रक्तपेढी 15 दिवसात सुरू करणार- महापौर वाकळे

मनपाची रक्तपेढी 15 दिवसात सुरू करणार- महापौर वाकळे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मनपाच्या कै. देशपांडे रूग्णालयातील रक्तपेढी विभागासाठी आवश्यक असणारे कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येईल.

- Advertisement -

लवकरात लवकर रक्तपेढी सुरू करण्याच्या दृष्टिने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. मनपाच्या वतीने लवकरात लवकर रक्तपेढी सरू करून रक्तपिशवी उपलब्ध होईल यादृष्टिने कार्यवाही होणे आवश्यक आहे. याबाबत आवश्यक असणारे कर्मचारी प्रशासनाने तातडीने नियुक्त करावे. 15 दिवसात होलब्लड उपलब्ध होईल या दृष्टिने कार्यवाही करण्याच्या सुचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिल्या आहे.

रक्तपेढी विभागाची महापौर वाकळे यांनी बैठक घेतली यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, मुख्य लेखाअधिकारी प्रविण मानकर, रक्तपेढी विभाग प्रमुख डॉ. शेडाळे व कर्मचारी उपस्थित होते. रक्तपेढी विभागासाठी पूर्ण वेळ डॉक्टर, टेक्निकल सुपरवायझर, लॅब टेक्निशियन उपलब्ध न झाल्यामुळे रक्तपेढीचे काम बंद अवस्थेत आहे.

याबाबत यापूर्वी रक्तपेढी सुरू करण्याच्या दृष्टिने बैठक घेवून रक्तपेढी मनपाच्या वतीने सुरू करण्याकरिता डॉक्टर, लॅब टेक्निशियन, सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यासाठी आस्थापना खर्च जास्त असल्यामुळे अडचणी येत होत्या. शहरातील गोरगरिब रूग्णांची रक्त पिशवीची मागणी पाहता मनपाच्या वतीने रक्तपेढी सुरू करण्याच्या दृष्टिने कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या