Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यामनपाकडून गोवर रुबेला लसीकरण मोहीम

मनपाकडून गोवर रुबेला लसीकरण मोहीम

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ( Department of Public Health, Government of Maharashtra )निर्देशीत केल्याप्रमाणे नाशिक महानगरपालिकेकडून (NMC )15 डिसेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. मोहिमेतील पहिल्या टप्प्यात 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर आणि दुस-या टप्प्यात 15 जानेवारी 2023 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत गोवर रुबेला लसीकरण मोहिम (Measles Rubella Vaccination Campaign ) राबवण्यात येणार आहे.

- Advertisement -

शहरातील सर्व शहरी आरोग्य केंद्र व रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी यांना वेळोवेळी लसीकरणबाबत मार्गदर्शन करण्यात येत असते. शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार पुन्हा एकदा सर्व वैद्यकीय अधिकारी यांची कार्यशाळा मनपा मुख्यालयात आज दि. 12 डिसेंबर रोजी पार पडली. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ प्रकाश नांदापूरकर यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.

डॉ. प्रकाश नांदापूरकर आणि माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंके यांनी शहरी प्राथमिक केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेविका यांना विशेष मोहीम काळात १०० टक्के लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेत मनपा क्षेत्रात आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करणार आहेत.

9 महिने ते 5 वर्षे वयाच्या बालकांचा गोवर रुबेला लसीचा पहिला किंवा दुसरा डोस अथवा दोन्ही डोस राहिलेल्या बालकांची यादी तयार करण्यात येणार आहे. ग्रामीण, शहरी आणि महानगरपालिका क्षेत्रात या विशेष लसीकरण मोहिमेत वंचित राहिलेल्या बालकांना लस लस दिली जाणार आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर 28 दिवस असेल याची खबरदारी घेण्याची सुचना शासनाच्या आरोग्य विभागाने केली आहे.

तसेच या विशेष मोहिमेत ज्या 5 वर्षांपर्यंतच्या बालकांना नियमीत जीवनसत्व ‘अ’ चा डोस दिला गेला नसेल त्या सर्व बालकांना जीवनसत्व ‘अ’चा डोस देण्यात यावा असे निर्देशीत केले आहे. या मोहिमेत स्थानिक वैद्यकीय व्यवसायिक संघटना आणि बालरोग तज्ज्ञ संघटना यांचाही सहभाग असावा, अशी सुचना आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या