Wednesday, January 7, 2026
Homeनगरनशेचे इंजेक्शन विकणारा खंडाळ्यातील मेडिकल चालक ताब्यात

नशेचे इंजेक्शन विकणारा खंडाळ्यातील मेडिकल चालक ताब्यात

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

नशेचे इंजेक्शन विकताना तालुक्यातील खंडाळा येथील मेडीकल चालकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पंकज राजकुमार चव्हाण, (वय २१, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर) ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार कबाडी यांना श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा परिसरातील शिव मेडीकलचे चालक नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती मिळाली, मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जावून सापळा लावला.

YouTube video player

पथकाने एका बनावट गि-हाईकाला पाठवून मेडिकलमधून बनावट इंजेक्शन घेण्यास सांगितले. सदर गिऱ्हाईकाने मेडिकल चालकास पैसे देवून बनावट इंजेक्शनचा बॉक्स घेतला. यावेळी लगेच पोलिसांनी त्या ठिकाणी जावून छापा टाकला असता त्यांना नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेटमाईनच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी सदर ठिकाणाहून ३१ हजार ३७० रुपये किंमतीचा नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बाटल्या व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रमीझराजा रफीक आतार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, १२५, २७८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दिपक मेढे, पोलीस अंमलदार विजय पवार, राहुल द्वारके, रिचर्ड गायकवाड, सुनिल मालणकर, रमीझराज आतार, चंद्रकांत कुसळकर यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

ताज्या बातम्या

Ridhima Pathak : ‘देश आधी, लीग नंतर!’ भारतीय प्रेझेंटर रिद्धिमा पाठकची...

0
दिल्ली । Delhi भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या अत्यंत तणावपूर्ण वळणावर आहेत. राजकारण आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांत दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र होताना...