Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याधक्कादायक! नाशिकमधील 'एवढ्या' मेडिकल स्टोअर्सचे परवाने रद्द; हे आहे कारण...

धक्कादायक! नाशिकमधील ‘एवढ्या’ मेडिकल स्टोअर्सचे परवाने रद्द; हे आहे कारण…

सातपूर | प्रतिनिधी

जिल्ह्याच्या अन्न आणि औषध विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या दोन महिन्यांच्या कारवाईत नाशिक शहर आणि जिल्ह्यातील एकूण ६१ औषधी दुकानदारांच्या दुकांनाचे परवाने रद्द करण्यात आले आहेत…

- Advertisement -

अन्न आणि औषध विभागतर्फे जिल्ह्यातील ६१ दुकानमालकांनी त्यांच्या दालनात अधिकृत फार्मसिस्टची नियुक्ती न केलेल्या तसेच परवान्यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरही नूतनीकरण न केलेले दुकानांवर ही कारवाई करण्यात आली.

दुकान उघडण्यापासून बंद होईपर्यंत दुकानात पूर्णवेळ किमान एक फार्मसिस्ट असणे बंधनकारक असतानाही या दुकानांनी त्याची पूर्तता केली नसल्याचे आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

औषध दुकानांचे परवाने दर पाच वर्षानी नूतनीकरण करून घ्यावे लागतात. त्यात सहा महिन्यांपर्यंत अतिरिक्त मुदतदेरवील असते. मात्र, तेवढ्या कालावधीत परवाना नूतनीकरण करून न घेतल्यास तो रद्दबातल करून दुकान बंद करण्याची कारवाई केली जाते.

दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार मास्क हे निर्धारित किमतीत विक्री करण्याबाबत जिल्ह्यातील २७० औषधी विक्रेत्यांचीदेखील तपासणी करण्यात आली. त्यातील तीन दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

मालेगाव चे एका औषध ही दुकानात अवैधरीत्या गर्भपाताच्या औषधांचा साठा करण्यात आल्याबद्दल मालेगावच्या आझादनगर पोलिसांसमवेत धाड टाकून ९० हजार रुपये किमतीचा अवैध औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत अन्न आणि औषध विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औषधी निरीक्षक सुरेश देशमुख, चंद्रकांत मोरे, प्रशांत ब्राह्मणकर, महेश देशपांडे, अक्षयानंद मन्नूर आणि मालेगावच्या एका औषधी दुकानात दीपाली गवई यांनी ही सहभाग घेतला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या