Friday, May 3, 2024
Homeनगरअकोले, समशेरपूर येथील कोविड सेंटरला औषधांची मदत

अकोले, समशेरपूर येथील कोविड सेंटरला औषधांची मदत

अकोले (प्रतिनिधी)

भारतीय जनता पार्टीच्या उत्तर नगर महिला जिल्हाध्यक्षा सोनालीताई चेतनराव नाईकवाडी यांनी करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीच्या भावनेने अकोले व समशेरपूर येथील कोविड सेंटरसाठी एक लाखाहून अधिक रकमेची औषधे उपलब्ध करून दिली आहे.

- Advertisement -

अकोलेच्या कोविड सेंटरसाठीची औषधे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी स्विकारली. तर समशेरपूर येथील मधुकरराव पिचड यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला देखील मुबलक प्रमाणात औषधे देण्यात आली. ही औषधे आनंदगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा अमृतसागर दुध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे व सामाजिक कार्यकर्ते संदिप दराडे यांनी स्विकारली.

लसीचा तुटवडा; ज्येष्ठांचा पहिल्या डोसला ब्रेक

तसेच समशेरपूर येथील कोविड सेंटरसाठी मिनरल वॉटर म्हणून पाणी बॉटलचे 100 बॉक्स देखील सौ. नाईकवाडी यांनी सुपूर्द केले. तसेच विरगाव व अगस्ती आश्रम येथील गोशाळांना चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हिरवा चारा देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोनाली नाईकवाडी यांचा सामाजिक उपक्रमात नेहमीच सहभाग असतो. येत्या काही दिवसांत अकोले शहरात सोनाली नाईकवाडी यांच्या नावाने एक कोविड सेंटर उभे केले जाणार आहे. यावेळी उद्योजक चेतनराव नाईकवाडी, भाजपचे जिल्हा संयोजक संदिप दातखिळे, पप्पू वाकचौरे, सचिन नाईकवाडी, संजय बोडके आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या