Thursday, May 2, 2024
Homeनगरलहारे नवे नगर सचिव

लहारे नवे नगर सचिव

अहमदनगर (प्रतिनिधी) –

महापालिका प्रशासनात 31 डिसेंबरपासून किरकोळ खांदेपालट करण्यात आली आहे. मेहेर लहारे यांच्याकडे नगर सचिवपदाची तर

- Advertisement -

सहायक आयुक्त सचिन राऊत यांच्याकडे कोविड नोडल अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शहाजान तडवी पुन्हा सामान्य प्रशासन विभागात परतले आहेत.

आस्थापनाप्रमुख असलेले मेहेर लहारे हे नाजूक आरोपांमुळे वादग्रस्त ठरले होते. त्याची चौकशी करून आयुक्तांना अहवाल सादर करण्यात आला होता. लहारे यांच्याकडील आस्थापनाप्रमुखाचा पदभार काढून त्यांना नगर सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर त्यांच्याकडे उद्यान विभागाचा अतिरिक्त पदभारही सोपविण्यात आला आहे.

सहायक आयुक्त असलेले सचिन राऊत यांच्याकडे कोविडसंदर्भातील कामकाज व शहर नोडल अधिकारी आणि उपायुक्त (क.) हा पदभार देण्यात आला आहे. लहारे यांच्याकडून काढलेला आस्थापनाप्रमुखाचा अतिरिक्त पदभार राऊत यांना देण्यात आलेला आहे.

अनिल बोरगे कोविडमधून कार्यमुक्त

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना कोविडच्या कामकाजामधून कार्यमुक्त करण्यात आले आहे. आरोग्याधिकारी पदासोबतच घनकचरा व कोंडवाडा विभागाचे नियंत्रण बोरगेंकडे असणार आहे. तत्कालीन आयुक्तांनी डॉ. बोरगे यांची सेवा पुनर्स्थापित केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या